⚡ ब्रेकिंग News

आटपाडी पंचायत समितीची पहिलीच मासिक सभा वादळी; सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांची सदस्यांनी केली कानउघडणी

आटपाडी पंचायत समितीची चार वर्षानंतर पहिलीच मासिक सभा वादळी झाली.
 चार वर्षे प्रशासक होते.प्रलंबित प्रश्न आणि पदाधिकारी नसल्याने सुस्तावलेलया अधिकाऱ्यांची पंचायत समिती सभेत कान उघडणी केली. 
 सभापती दत्तात्रय पाटील, उपसभापती कल्पना पुसावळे, जयवंत सरगर, दादासाहेब मोटे, वैशाली कातुरे, मिनाक्षी पुजारी, सुनिता सरगर उपस्थित होते. रोजगार हमी कामातील दिरंगाई, लोकांचे प्रस्ताव मंजूर न करणे, लोकांना हेलपाटे मारावे लागत असल्याचा प्रश्न मांडला. हमीची कामे वेळेत मंजूर करून वेळेत सर्व मस्टर काढण्याची सुचना केली.
    तसेच पाणीपुरवठा विभागाकडे राष्ट्रीय पेयजल योजनाची रखडलेली त्वरित चालू करण्यात यावी.ज्या गावातील कामे अपूर्ण आहेत ती कामे केली जात नाहीत अशा चौकशी करून अपूर्ण कामे सर्व पूर्ण करावीत. कॉन्ट्रॅक्टरला कुठलेही बिल अदा करण्यात येऊ नये. दिलेली बिले परत शासनाकडे भरून घ्यावीत, त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे.
     बांधकाम विभागाकडील निकृष्ट कामे आहेत तसेच कामे चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. त्याची बिले देण्यात येऊ नयेत.अन्यथा अधिकाऱ्यांना स्वस्त बसू दिले जाणार नाही असा इशु सदस्यांनी दिला.
     ग्रामपंचायत विभाग, कृषी, आरोग्य, जलसंधारण, एकात्मिक बालविकास, सार्वजनिक बांधकाम, आटपाडी तालुका एसटी आगार विभाग, छोटे पाटबंधारे, डी आर डी विभाग, वन विभाग, सामाजिक वन, तसेच अन्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जे अधिकारी सभेस उपस्थित नव्हते त्यांना नोटीस काढण्याची सर्व सदस्यांनी सूचना केली.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...