आटपाडी येथील दि. बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेला २०२५-२६ या आर्थिक वर्षात ९ कोटी ८ लाखांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या देशमुख बँकेने संपलेल्या आर्थिक वर्षात विक्रमी ८५६ कोटी ३९ लाखांचा व्यवसाय केल्याचे सांगितले.
बाबासाहेब देशमुख बँकेचा लेखाजोखा संस्थापक अमरसिंह देशमुख यांनी मांडला. सहकार क्षेत्रात बँकेची वाटचाल अधिक होत असल्याचे स्पष्ट केले. दुष्काळी भागात बँकेची स्थापना केली.
आज बँकेच्या बारा शाखा व प्रधान कार्याल आहेत. मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ५०९ कोटी ४१ लाखाच्या ठेवी झाल्या आहेत. तर कर्जवाटप ३४६ कोटी ९८ लाख केले आहे. बँकेचे भाग भांडवल २१ कोटी ९१ लाख, स्वनिधी ४९ कोटी २३ लाख, गुंतवणूक २१६ कोटी ८० लाख इतकी आहे.
देशमुख बँकेला ढोबळ नफा ९ कोटी ८ लाख रूपये आणि निव्वळ नफा ४ कोटी ७३ लाख झाला
आहे. गेली २१ वर्षे नेट एनपीए शुन्य टक्के ठेवला आहे. बँकेचा सीआरएआर नियमाप्रमाणे १० टक्के आवश्यक असताना तो १७.२५ टक्के ठेवला आहे. बँकेने ग्राहकांना मोबाईल बँकीग, युपीआय, आरटीजीएस, एनईएफटी, सीटीएस, पीओएस, आयएमपीएस, एटीएम,
एनएसीएच, फॅन्कींग स्टॅम या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष दादासाहेब पाटील, उपाध्यक्ष जयंत देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक भगवंत पाटील-आडमुठे यांच्यासह सर्व संचालक व बँकेचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले आहे. समासद, ठेवीदार व कर्जदारांच्या सहकार्यामुळेच बैंकने प्रगती केले आहे. येणाऱ्या कालावधीत देशमुख बँकेची ही प्रगती राज्यात नवा अध्याय निर्माण करेल, असा विश्वासही संस्थापक अमरसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.
एक हजार कोटी व्यवसायाचा निर्धार
दि. बाबासाहेब देशमुख बँकेने मार्च २०२६ अखेर ८५६ कोटी ३९ लाखांचा एकुण व्यवसाय केला आहे. संचालक मंडळाने २०२५-२६ साठी सभासदांना १० टक्के लाभांश आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना यांना जादा पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. तसेच २०२६-२७ मध्ये १००० कोटी व्यवसाय पूर्ण करणेचा निर्धार संचालक मंडळाने केल्याचे बँकेचे संस्थापक अमरसिंह उर्फ बापुसाहेब देशमुख यांनी स्पष्ट केले.
Post a Comment