आटपाडी ता. 18 : येथील आदर्श को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला मार्चअखेर निव्वळ नफा ३२ लाख ६५ हजार झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दौंडे आणि उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी दिली. देशमुख बँकेच्या प्रधान कार्यालयात आदर्श सोसायटीच्या संचालकाची बैठक अमरसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. यावेळी अध्यक्ष प्रकाश दौंडे यांनी संस्थेचा आढावा मांडला. ते म्हणाले,"१८५२ सभासद असून वसूल भागभांडवल १ कोटी १० लाख, राखीव व इतर निधी ९८ लाख ५५ हजार, ठेवी ८ कोटी तर गुंतवणूक ३ कोटी ५५ लाख केली आहे तसेच कर्ज वाटप ७ कोटी १ लाख, स्वनिधी १ कोटी ९५ लाख असून संस्थेने ३७ कोटी ८५ लाखाची वार्षिक उलाढाल केली. सीडी रेशो ६४.१७% आहे. संस्थेच्या या प्रगतीत सर्व संचालक कर्मचारी, पिग्मी एजंट यांनी मोलाचे सहकार्य केले. या बैठकीत सर्व संचालक मंडळ कर्मचारी व पिग्मी एजंट यांचे अभिनंदन अमरसिंह देशमुख यांनी केले. ते म्हणाले चालू वर्ष सर्वच सहकारी संस्थांना अडचणीचे गेले. अशा अवस्थेत देखील संस्थेची आकडेवारी पाहता अतिशय चांगले काम संस्थेने केले. संस्थेची स्वमालकीची इमारत उभी करण्यासाठी सर्व संचालक मंडळांनी प्रयत्न करावे." उपाध्यक्ष दीपक देशमुख म्हणाले संस्थेला १० वर्ष झाली अल्पावधीत आकडेवारी पाहता संस्थेने यशस्वी वाटचाल केली आहे ." सचिव दत्तात्रय स्वामी यांनी सर्व आकडेवारी मागील आर्थिक वर्ष व चालू आर्थिक वर्ष व यामध्ये झालेली वाढ/ घट वाचून दाखवली. संचालक राजेंद्र लाटणे, सर्जेराव राक्षे,विकास भुते, सागर भागवत, सुरज म्हेत्रे, संभाजी देशमुख उपस्थित होते
आटपाडीतील आदर्श कॉपरेटिव्ह सोसायटीला 32 लाखाचा नफा
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment