सातारा : नुकतीच सांगलीत बदली झालेले पोलीस अधीक्षक तुषार (Tushar Doshi) दोशी हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. ज्या दिवशी साताऱ्यातून बदली झाली त्याच दिवशी तुषार दोशींनी नियमबाह्य पद्धतीने जिल्ह्यातील सहा ते सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप केला जात आहे. या संबंधी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जंयवंतराव शेलार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहित या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. साताऱ्यात वादग्रस्त कारकीर्द राहिलेले पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली. त्या आधी ते सक्तीच्या रजेवर होते. मात्र सांगलीमध्ये बदलीचे आदेश आलेल्या दिवशीच तुषार दोशी यांनी नियमबाह्य पद्धतीने, त्याच्या अधिकारात नसतानाही साताऱ्यातील सहा ते सात अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
तुषार दोशी यांनी केलेल्या या बदल्या नियमबाह्य आहेत अशी तक्रार करत सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पत्र लिहिलं आहे. दोशींनी केलेल्या या बदल्यांची चौकशी करावी आणि त्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे
Post a Comment