⚡ ब्रेकिंग News

मुळशीत प्रशासनाचा 'बुलडोझर'; मोबदल्याविनाच शेतकऱ्याचे घर आणि गोठा जमीनदोस्त!

मुळशी (रिहे): "माझ्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही, प्रकरण कोर्टात आहे, तरीही पोलिसांनी मला बाजूला सारून माझं हक्काचं घर पाडलं. आता माझ्या गायींना घेऊन मी कुठे जाऊ?" हा आर्त टाहो आहे मुळशी तालुक्यातील रिहे येथील शेतकरी विलास रामचंद्र शिंदे यांचा. पुणे रिंग रोडच्या कामासाठी आज प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून शिंदे यांचे राहते घर, गोठा आणि शेडवर बुलडोझर फिरवला. पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी रिहे गावातील विलास शिंदे यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र, शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, या जमिनीचा मोबदला त्यांना अद्याप मिळालेला नाही आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असे असतानाही, आज सकाळी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस ताफा शिंदे यांच्या दारात धडकला. कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी या कारवाईला जोरदार विरोध केला, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून कुटुंबाला बाजूला केले आणि कारवाई सुरू केलीभर पावसात संसार उघड्यावर:
अवघ्या काही तासांत विलास शिंदे यांचे आरसीसी घर, जनावरांचा गोठा आणि कुक्कुटपालन शेड जमीनदोस्त करण्यात आले. विशेष म्हणजे, शिंदे यांच्याकडे १५ हून अधिक दुभत्या गायी आहेत. घर आणि गोठा पाडल्यामुळे या मुक्या जनावरांच्या चारा-पाण्याचा आणि निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. भर उन्हात आणि अवकाळी पावसाच्या सावटाखाली या शेतकरी कुटुंबाचा संसार आता उघड्यावर आला आहेप्रशासनाने हक्काचा मोबदला न देताच ही जुलमी कारवाई केली आहे," असा आरोप विलास शिंदे यांनी केला आहे. कोणतीही पूर्वसूचना किंवा राहण्याची पर्यायी व्यवस्था न करता थेट घर पाडल्यामुळे मुळशी तालुक्यातील शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रिंग रोडच्या नावाखाली शेतकऱ्यांचे बळी दिले जात असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...