⚡ ब्रेकिंग News

वीरशैव पतसंस्थेला १ कोटी ४२ लाखांचा ढोबळ नफा

आटपाडी - येथील वीरशैव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने संपलेल्या आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १ कोटी ४२ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळवला असल्याची माहिती अध्यक्ष अजित भिंगे आणि उपाध्यक्षा सौ. शिल्पा हेकणे यांनी पत्रकार बैठकीत दिली. मार्च २०२६ अखेर संपलेल्या वर्षात संस्थेचा एकूण व्यवसाय ४८ कोटी ८४ लाख रुपयांवर पोहोचला आहे. तो आत्तापर्यंत सर्वाधिक नोंदवला गेला आहे. यात ७२ लाख ३८ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. ठेवीत २४ कोटी २६ लाखांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच २२ कोटी ५७ लाख रुपयांचे कर्जवाटप करून गरजू सभासदांना आर्थिक हातभार लावला आहे.
संस्थेचा नेट एनपीए २.६५% इतका मर्यादित राखण्यात प्रशासनाला यश आले असून सीडी रेशो ७८.३७% आहे. संस्थेची स्वतःची इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, लवकरच ते सभासदांच्या सेवेसाठी सज्ज होईल ३.९४% सीएसआर निधीची तरतूद केली आहे.यासाठी अध्यक्ष अजित भिंगे, उपाध्यक्षा शिल्पा हेकणे, सचिव वृषाली कुंभार, शाखाधिकारी इम्रान मुल्ला आणि सर्व संचालक मंडळाचे मोलाचे योगदान लाभले आहे. प्रतिसेवक ८ कोटी १४ लाखांचा व्यवसाय झाल्याबद्दल कर्मचाऱ्यांचेही विशेष कौतुक केले.
या यशाबद्दल बोलताना अध्यक्ष अजित भिंगे म्हणाले की, "सभासदांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवहार हीच आमची ताकद आहे. येणाऱ्या काळात विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून संस्था प्रगतीचे नवे शिखर गाठेल. फोटो -1) अजित भिंगे

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...