आटपाडी दि . १ ( प्रतिनिधी ) रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लि . कंपनीच्या आटपाडी तालुक्यातील आरोग्य सल्लागारांच्या माध्यमातून महत्वपूर्ण सेमिनार संपन्न झाला .
रियांशचे ग्रेट लीडर प्रमोद नलवडे, संजय हिरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष यु . टी . जाधव सर, आटपाडी तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ . भुमिकाताई बेरगळ, श्री . भवानी शिक्षण संस्थेचे चेअरमन युवा नेते सुरज पाटील, आटपाडी तालुक्याच्या पहिल्या महिला पत्रकार सुनेत्रा देशपांडे - कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य दादासाहेब मोटे सर यांच्या सन्माननीय उपस्थितीत पार पडला .
रियांशचे सीएमडी मधुकर जाधव साहेबांच्या नेतृत्वाखालील रियांश कंपनी आपल्या विविध उत्पादने आणि व्यवसायातील नेत्रदीपक रचनेद्वारे भविष्यात संपूर्ण भारतभर लक्षवेधी कामगीरी करणार आहे . असे प्रारंभीच स्पष्ट करून रियांशचे ग्रेट लीडर प्रमोद नलवडे यांनी, कंपनी प्रोफाइल, प्रॉडक्ट बद्दल माहीती, प्लॅन प्रेझेंटेशन, बिसनेसची रियर स्ट्रॅटेजी, हेल्थ आणि वेल्थ संदर्भाने महत्वपूर्ण मार्गदर्शन केले .
कंपनी कडून आणि प्रमोद नलवडे साहेबांच्या कडून लावल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांची माहिती दिली .
रियांश मधील प्रॉडक्टचा आपणांस आलेला अफलातून अनुभव शेअर करत नगराध्यक्ष यु . टी . जाधव सरांनी आपल्या निवडणूकीतील विजयापर्यतची खडतर वाटचाल, आटपाडी शहराच्या चौफेर आणि सर्वांगीण विकासासाठी आपले व्हीजन स्पष्ट केले . ध्येयवेडा पत्रकार, स्वाभीमानी, प्रामाणिक कार्यकर्ता सादिक खाटीक हे यापुढच्या काळात आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हावेत . समाजातील प्रत्येकाच्या आरोग्याला चालना मिळावी म्हणून आणि सादिक खाटीक यांना साथ द्यायची भावना ठेवूनच मी रियांशचा प्रसार प्रचार करणार असल्याचे नगराध्यक्ष यु . टी . जाधव सर यांनी बोलून दाखविले.
गोमेवाडीच्या सामाजीक कार्यकर्त्या, आटपाडी तालुक्याच्या पहिल्या महिला पत्रकार सुनेत्रा देशपांडे - कुलकर्णी यांनी रियांश अमृत ज्युस व इतर प्रॉडक्टने आपल्या परिवारात आलेले अनुभव कथन केले आपल्या अभ्यासू मार्गदर्शनाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली .
यावेळी गोमेवाडी ग्रा . पं च्या माजी सदस्या शबाना मुलाणी, आटपाडी तालुक्याच्या महिला नेत्या अर्चना वसंतराव जगताप गोमेवाडी, बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सेवेत असलेल्या मनिषा बनसोडे - यादव आटपाडी, बँक ऑफ इंडिया मध्ये सामाजीक सेवा बजावत असलेले प्रशांत मोटे , कामथ गावचे माजी सरपंच परशुराम सरक, दिघंची ग्रा . पं. चे माजी सदस्य विनोदराव बनसोडे, शेटफळे गावचे सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड, मासाळवाडी ग्रा . पं . चे नितीन डांगे, गोमेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते बापुराव सोहनी, अल्लाबक्ष मुलाणी, आटपाडीचे युवा नेते दत्ता रावळ, बनपुरीचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव ऐवळे, सामाजीक कार्यकर्त्या राबियाँबसरी खाटीक, जस्मीन कमलीवाले, अर्षद खाटीक, सौ. मंगल कोरवी मॅडम, स्वाती भोसले मॅडम, आशीष जाधव सर, सुरेश कदम सर, इर्शाद मुलाणी सर, महादेव देवकर सर, नाथकलंदर खाटीक इत्यादी अनेक मान्यवर आरोग्य सल्लागार उपस्थित होते .
यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान करणेत आला . महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा यावेळी सर्वांना देण्यात आल्या . कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सादिक खाटीक यांनी केले . तर गणेश ऐवळे सर यांनी उत्तम सुत्रसंचालन करत आभार मानले .
Post a Comment