⚡ ब्रेकिंग News

भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका मांडली

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच रण पेटलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता थेट ईडीला पाचारण करण्यापर्यंत गेलं आहे. गोकुळ दूध संघाच्या कारभारावरून कोल्हापुरातील भाजप समर्थक अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष वाढला आहे.  दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये ताणलेल्या या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल (19 एप्रिल) दिवसभर कोल्हापूरमध्ये मॅरेथॉन बैठका घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. अज्ञातस्थळी झालेल्या या बैठकीत हसन मुश्रीफ यांनी शिवाजी पाटील यांनी केलेल्या आरोपांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या नाराजीनंतर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी तातडीने आमदार शिवाजी पाटील तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीतही आमदार शिवाजी पाटील यांनी भाजप संपवायला निघालेले हसन मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नको अशी स्पष्ट भूमिका घेतल्याचे समजते.        महायुतीमध्ये वाद निर्माण होतील अशी वक्तव्य कोणीही करू नका
शिवाजी पाटील यांच्या भूमिकेला भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिल्याने चंद्रकांतदादा पाटील देखील हतबल झाले. लवकरच याबाबत पुन्हा बैठक घेऊ. मात्र, तोपर्यंत महायुतीमध्ये वाद निर्माण होतील अशी वक्तव्य कोणीही करू नका अशा सक्त सूचना चंद्रकांत पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे गोकुळ निवडणुकीवरून आता महायुतीमधील मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत. येत्या काळात महायुतीमधील राज्यस्तरीय नेते यावर काय तोडगा काढतात यावर गोकुळच्या आगामी निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.  युतीधर्म' म्हणून दीडवर्ष सहन करीत आहोत 
दरम्यान, चार दिवसांपूर्वी सुद्धा शिवाजी पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर आरोप केला होता. मुश्रीफ यांनी 'काँग्रेस'शी हातमिळवणी करून जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप व शिंदेसेनेचे उमेदवार पाडले. महायुती सरकारमध्ये राहून, सरकारचे संरक्षण घेवून ते जिल्ह्यातील भाजप संपविण्याचे काम करीत आहेत. 'युतीधर्म' म्हणून दीडवर्ष सहन करीत आहोत. परंतु, ते खातात ‘महायुती’च आणि गाणं गातात ‘महाविकास’चं आघाडीचं, असा आरोप शिवाजी पाटील यांनी केला होता. मंत्रीपदाच्या जोरावर ‘गोकुळ’मधील भ्रष्ट व मनमानी कारभाराला ते पाठीशी घालत आहेत.परंतु,'गोकुळ’च्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षही माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे आता हे चालू देणार नाही.'केडीसीसी’ बँकेच्या कारभाराचेही पुरावे जमा करत असून पुरावे मिळताच त्यावरही बोलणार आहे,असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला होता

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...