नाशिक :भोंदू अशोक खरात प्रकरणाशी एकनाथ शिंदे यांचं कनेक्शन असल्याने प्रकरणाचा सर्वार्थाने तपास सुरु झालाय, असा खळबळजनक आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानाव यांनी केलाय. भोंदू अशोक खरात प्रकरणाशी (Ashok Kharat Case) एकनाथ शिंदे यांचं कनेक्शन असल्याने प्रकरणाचा सर्वार्थाने तपास सुरुझालाय, खरात प्रकरण आज घरोघरी पोहचलं यासाठी आभार मानले पाहिजे ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे. कारण, हा बाबा एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता, आणि अजित पवारांच्या गटातील रूपाली चाकणकर याची भक्त नसती तर कधीच हा बाबा उघड झाला नसता. कदाचित पहिलेच प्रकरण पोलिसांनी त्यांच्या पातळीवर दाबवून टाकावे, अशा सूचना मिळाल्या असत्या. पण, एकनाथ शिंदें आणि राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे, म्हणून उत्तम प्रकारे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या. असा धक्कादायक आणि खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी केलाय. सोबतच्या महिलांचे व्हिडिओ कदाचित बघितले असतील. कोणत्याही महिलांचे कपडे त्या बाबाने काढले नाही. जे बाबा महिलांना भीती दाखवतात ते मूर्ख आहेत. कारण, बाबाला काहीही करायची गरज नाही, फक्त जाहीर करायचं 'मी गुरु आहे तुमचा', बसं सगळं संपलं. सर्व आयतं उपलब्ध होत, नंबर लागत नसल्याची परिस्थिती राहते. आज देशात इतकी भयावह परिस्थिती आहे. आज एखाद्या महिलेची छेड काढली तर हाणामारीचे प्रसंग येतात. आणि याचं देशात हजारोच्या संख्येने महिला स्वतःला बाबाला अर्पण करत आहे. हजारो वर्षांपासून या देशात हे बिंदासपणे सुरु आहे, नव्हे तो आपल्या कल्चरचा भाग मानला जातोय. अशीखंतहीश्याममानवयांनीबोलून दाखवलीय.
भोंदू खरात हा एकनाथ शिंदे अन् रुपाली चाकणकरांचा गुरु
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment