⚡ ब्रेकिंग News

,,अन् नागनाथअण्णांनी सातारा जेल फोडला! गोऱ्या साहेबांच्या डोळ्यांत धूळ फेकून ‘पत्री सरकार’चा वाघ भूमिगत झाला,


सांगली
पाऊलखुणा
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अत्यंत थरारक आणि ब्रिटीश साम्राज्याला आव्हान देणारी घटना १० सप्टेंबर १९४४ रोजी सातारा जेलमध्ये घडली. सातारा प्रतिसरकारचे (पत्री सरकार) धडाडीचे नेते क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सातारा कारागृहाच्या उंच तटबंदीवरून उडी मारून यशस्वी पलायन केले होते, ज्यामुळे संपूर्ण ब्रिटीश प्रशासन हादरून गेले आहेसहकाऱ्यांच्या मदतीने रचला व्यूहरचना
मिळालेल्या माहितीनुसार, नागनाथअण्णांना २९ जुलै १९४४ रोजी वाळवा येथून अटक करण्यात आली होती. त्यांना सातारा येथील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, अण्णांनी जेलमध्येच आपल्या सुटकेचा आराखडा तयार केला होता. रविवारी पहाटे जेव्हा कैद्यांना स्वच्छतेसाठी बाहेर काढण्यात आले, तेव्हा ही संधी साधत अण्णांनी सहकाऱ्यांच्या खांद्याचा आधार घेऊन जेलच्या उंच भिंतीवर धाव घेतली.
जेलची ती भिंत तब्बल १८ ते २० फूट उंच होती. एका बाजूला बंदुका रोखून धरलेले ब्रिटीश पहारेकरी आणि दुसरीकडे खोल दरी, अशा परिस्थितीतही अण्णांनी ‘भारत माता की जय’ अशी गर्जना करत खाली उडी मारली. या उडीमुळे त्यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली, तरीही त्यांनी डगमग न जाता अत्यंत चपळाईने तेथून पळ काढला. पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून भूमिगत
पलायन केल्यानंतर अण्णांनी गणपतीसाठी दुर्वा गोळा करण्याचा बहाणा करत पोलिसांची दिशाभूल केली. जखमी अवस्थेत असतानाही तेथून ते थेट सोमवार पेठेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि तिथून भूमिगत झाले. या घटनेमुळे खजील झालेल्या ब्रिटीश सरकारने अण्णांना पकडून देणाऱ्यास १,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
आजही साताऱ्यात ही घटना ‘जेलफोड शौर्य दिन’ म्हणून साजरी केली जाते

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...