⚡ ब्रेकिंग News

सांगलीच्या मार्केटयार्डातील समस्या मार्गी लावणार; खासदार विशाल पाटील यांचा व्यापाऱ्यांना शब्द

सांगली : "वसंतदादा मार्केटयार्ड सांगलीच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. येथील व्यापाऱ्यांना सुसज्ज आणि सुरक्षित वातावरण मिळणे अत्यंत आवश्यक असून, त्यांचे प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी दिली. सांगलीतील वसंतदादा मार्केटयार्ड येथे आयोजित व्यापारी बांधवांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
या बैठकीत व्यापारी बांधवांनी मार्केटयार्डातील दैनंदिन व्यवहारांत येणाऱ्या विविध अडथळ्यांवर खासदारांचे लक्ष वेधले. प्रामुख्याने रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांची असलेली कमतरता, बाजारपेठ परिसरातील अस्वच्छता,
वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगसाठी जागेचा अभाव, आणि बाजार समिती प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. व्यापाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर खासदार विशाल पाटील म्हणाले की, "व्यापाऱ्यांचा व्यवसाय सुरळीत चालणे हे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीसाठी गरजेचे आहे. बाजारपेठ अधिक सक्षम व्हावी आणि ग्राहकांनाही चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून हे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही दिली.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...