आटपाडी : बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडियन ॲथलेटिक्स सिरीज नॅशनल टूर्नामेंट’मध्ये येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या विश्वजीत जाधव याने गोळाफेक प्रकारात कांस्य पदक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले. त्याच्या यशामुळे महाविद्यालय आणि आटपाडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विश्वजीत जाधव हा श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा विद्यार्थी असून तो सध्या पुणे येथे क्रीडा सराव करत आहे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने राष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले आहे. त्याला ऑलिम्पिक पदक विजेते सचिन खिलारी, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गौरव चव्हाण आणि कोल्हापूरचे समाधान खेडेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. विश्वजीतच्या या यशाबद्दल आटपाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, नगरसेवक ऋषिकेश देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले आणि शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गौरव चव्हाण यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. बिकट परिस्थितीतून मार्ग काढत विश्वजीतने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील इतर खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे. फोटो -1) आटपाडी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचा विद्यार्थी विश्वजीत जाधव यांनी गोळा फेक स्पर्धेत कांस्यपदक पटकावल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते सत्कार केला.
विश्वजीत जाधवचे गोळाफेक प्रकारात राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment