⚡ ब्रेकिंग News

राजेवाडीत भूमाफियाचा माजी सैनिकाच्या जमिनीवर कब्जा

आटपाडी : राजेवाडी येथे तलावाखालील शासनाने माजी सैनिकांना कसण्यासाठी म्हणून शेतजमिनी दिल्या आहेत. सध्या राजेवाडी गावातील काही लोकांनी शेत जमीन असणाऱ्या माजी सैनिकांना मारहाण करून शेतात येण्यास मज्जाव केला आहे. या लोकांनी महाराष्ट्र शासनाने माजी सैनिकाला दिलेली जमीन ताब्यात घेऊन तिथे वीट भट्टी उभारल्या आहेत. विहीर पडली आहे ऊस लावला आहे. याशिवाय शेतात गेलेल्या माजी सैनिकाच्या कुटुंबालाही मारहाण केली आहे. त्यामुळे या सैनिक कुटुंबाने संबंधित त्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या शेतजमीनीवर अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. अँड.सचिन सातपुते यांच्या नेतृत्वाखाली संबंधीत कुटुंबातील सदस्य यात सहभागी झाले आहेत. राजेवाडी येथील जमीन गट नं. ३८ मध्ये अतिक्रमण करून जमीन बळकावणा-या व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. आटपाडी तालुक्यातील राजेवाडी हद्दीतील जमीन गट नं. ३८ मधील भूमिहीन माजी सैनिकांसाठी अटी व शर्तीच्या आधारे जमीन कराण्यासाठी दिल्या आहेत. त्याच जमिनीमधून माजी सैनिक आणि त्याच्या कुटुंबाला दमदाटी करून कायदा हातात घेऊन माणूस बळाचा वापर करून त्या जमिनीमध्ये काहींनी घरे बांधली आहेत, विहीरी पाडल्या आहेत, उसाचे पिक घेतले जात आहे. शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणा-या, माजी सैनिकांच्या कुटुंबाच्या व्यक्तीवर व कायदा हातात घेणा-या व्यक्तीवर त्वरीत फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...