सांगली: जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड अर्ज भरणे प्रक्रिया सुरू.
भाजपकडून अध्यक्षपदासाठी स्वप्नाली मासाळ आणि उपाध्यक्ष पदासाठी जयराज पाटील यांचे अर्ज दाखल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून संगीता पाटील यांचा अध्यक्ष पदासाठी आणि ऋषिकेश लाड यांचा उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल.भाजपकडून अध्यक्षपदासाठी स्वप्नाली मासाळ तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या शितल बाबर यांनी अर्ज दाखल केले. तर उपाध्यक्ष पदासाठी जयराज पाटील आणि हिम्मत जाधव यांनी अर्ज दाखल केले.
महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संगीता पाटील, प्रतिमा मोरे यांनी अर्ज दाखल केले. तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे ऋषिकेश लाड आणि विद्या कुंभार यांचे अर्ज दाखल करण्यात आले.
छाननीत सर्व अर्ज वैध ठरविण्यात आले.
إرسال تعليق