⚡ ब्रेकिंग News

सांगलीत संतापाचा उद्रेक: १४ वर्षीय वेदांतच्या मारेकऱ्यांना फाशी द्या! विश्रामबाग येथे मूक कॅन्डल मार्च.

सांगली / प्रतिनिधी:आरग (ता. मिरज) येथील रेल्वे मालधक्क्यावरील ठेकेदारीच्या वादातून आणि खंडणीच्या प्रकरणातून हमाल पंचायतचे नेते बाळासाहेब बंडगर यांचा निष्पाप नातू वेदांत मारुती बंडगर (वय १४) याची घरात घुसून गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या भ्याड आणि अंगावर काटा आणणाऱ्या हत्याकांडामुळे संपूर्ण सांगली जिल्हा, विशेषतः सांगली शहर प्रचंड संतप्त झाले आहे. या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड नीलेश विठोबा गडदे (राहणार कुंभारी, जत) याच्यासह त्याच्या सर्व साथीदारांना थेट फाशीची शिक्षा द्या, या मागणीसाठी काल रात्री हजारो सांगलीकर रस्त्यावर उतरले. विश्रामबाग येथे जनसागर; कॅन्डल मार्चने वेधले लक्ष'कायदा आणि सुव्यवस्थेचा अंत, बळी गेला निष्पाप वेदांत!' अशा आशयाचे तीव्र फलक आणि बॅनर हातात घेऊन अबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी काल रात्री विश्रामबाग परिसर येथे भव्य कॅन्डल मार्च काढला. मेणबत्त्या पेटवून आणि शांतता राखत जनसमुदायाने वेदांतला अश्रूपूर्ण नयनांनी श्रद्धांजली वाहिली. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, हमाल संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्ह्यातील वाढती गुंडगिरी आणि भाईगिरी पोलिसांनी तात्काळ मोडीत काढावी, अशी संतप्त मागणी यावेळी करण्यात आली‌
घटनेनंतर पसार झालेल्या नीलेश गडदेला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कर्नाटक सीमा भागातून एका लॉजवरून अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील त्याचा साथीदार अतुल वायदंडे आधीच अटकेत असून, फरार असलेल्या अन्य तीन आरोपींचा (किरण लोखंडे, विशाल चौगुले, सागर चौगुले) शोध घेण्यासाठी पोलिसांनी ५ पथके रवाना केली आहेत. तसेच या प्रकरणात दुर्लक्ष केल्याबद्दल जतच्या पोलीस निरीक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. निष्पाप वेदांतला न्याय मिळेपर्यंत आणि मारेकऱ्यांना फाशी होईपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार सांगलीकरांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...