⚡ ब्रेकिंग News

सिंगापूर सिटी निवासी गृहप्रकल्पाचा आटपाडीत उद्या शुभारंभ

 आटपाडी ता. 24 : :
आटपाडीच्या विकासात आणि वैभवात महत्त्वाचे पाऊल टाकत शिवजल ग्रुपच्या महत्त्वाकांक्षी 'सिंगापूर सिटी' या निवासी गृहप्रकल्पाचा शुभारंभ शनिवार ता. २५ जुलै रोजी सकाळी ११.१२ वाजता होणार आहे.देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक अमरसिंह देशमुख यांनी केले आहे.
आटपाडीत आवळाई रस्त्यालगत उभा राहणारया १०० एकरांच्या निवासी गृहप्रकल्पात आधुनिक सुविधा, सुरक्षित परिसर, दर्जेदार बांधकाम आणि पारदर्शक व्यवहार यावर विशेष भर दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शुभारंभानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. पहिल्या २०० ग्राहकांना न्यू महाबळेश्वर येथे ५ गुंठ्यांचा फार्महाऊस प्लॉट मोफत दिला जाणार आहे. तसेच मर्यादित कालावधीसाठी सबसिडी डिस्काउंट ऑफरचाही मिळणार आहे.
प्रकल्पात १ आरके, १ बीएचके, २ बीएचके आणि ३ बीएचके अशा विविध प्रकारच्या घरांचे पर्याय माफक दरात उपलब्ध आहेत. आयोजन शिवजल आणि अमरसिंह (बापूसाहेब) देशमुख यांनी केले असून, नागरिकांनी या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून आपल्या स्वप्नातील घराच्या दिशेने पहिले पाऊल टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...