⚡ ब्रेकिंग News

सातारा: शिवसेनेचे आमदार महेश शिंदे सांगा कोणाचे?

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचे दोन जिल्हा परिषद सदस्य फोडत भाजपनं सत्ता काबीज केली. भाजपच्या प्रिया शिंदे या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या, त्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. उपाध्यक्षपदी भाजपचे राजू भोसले विजयी झाले. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडी मध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय आमदार एका पक्षाचे, पत्नी दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर सदस्य आणि सत्तेसाठी पक्षातीलच उमेदवार फोडले, नुसतेच फोडले नाहीत तर जिल्हा परिषदेचं अध्यक्ष देखील आपल्या पत्नीला बनवलं.

साताऱ्यात एकच प्रश्न महेश शिंदे कोणाचे?

जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजताच अनेकांनी सदस्य होण्याची स्वप्न रंगवली.यामध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांनीही उडी घेतली त्यांनी भाजपकडे तिकीट मागितलं आणि भाजपनेही गेल्या काही वर्षांतील कामाचा विचार करत त्यांना संधी दिली. मात्र इथून पुढे सुरू झाला राजकीय खेळ…शिवसेनेचे आमदार असलेले महेश शिंदे स्वतः मैदानात उतरले. आणि पत्नीला भाजपच्या चिन्हावर निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावली.आमदार महेश शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी आपल्या पत्नी प्रिया शिंदे यांना थेट जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान केलं.याच वेळी जिल्हा परिषद परिसरात हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू होता.पालकमंत्री शंभूराजे देसाई जखमी अवस्थेतही आपल्या सदस्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होते.पण त्याचवेळी त्यांना “घरातलाच घाव”बसल्याच्या चर्चा रंगू लागल्या.

कुमठे गटातील हणमंत जगदाळे आणि सातारा रोड गटातील सारिका फाळके या निवडून आलेल्या सदस्यांनी पक्षादेश डावलत भाजपला मतदान केलं. आणि भाजपच्या उमेदवार असलेल्या प्रिया शिंदे या अध्यक्षपदावर विराजमान झाल्या. यामुळे एकच प्रश्न उपस्थित झाला हा राजकीय डाव होता की पक्षाशी गद्दारी? सध्या साताऱ्यात एकच चर्चा रंगली आहे…आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे? शिवसेना की भाजप… की फक्त सत्तेचे?

या सगळ्या घडामोडींनंतर आता नजर लागली आहे ती पक्षश्रेष्ठींकडे…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराजे देसाई या “राजकीय बंडा”वर काय कारवाई करणार?

सातारा जिल्हा परिषदेत कोण फुटलं?

राष्ट्रवादी काँग्रेस
लता करणे - (बुध, खटाव)
ऋतुजा जगताप - (फलटण)
कामेश कांबळे - (सातारा)

अनिल देसाई (माण)
संदीप मांडवे (खटाव)

पोलिसांनी जिल्हापरिषद परिसरातून सकाळी दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्याखाली उचलून नेले

शिवसेना 
हणमंत जगदाळे (कोरेगाव कुमठे)
सारिका फाळके (सातारा रोड)

#satara #zillaparishad #Shivsena #NCP #BJP #news

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...