सांगली/आटपाडी:
सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि तासगाव तालुक्यांना नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वेगवान वाऱ्याने झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, द्राक्ष, आंबा आणि डाळिंबाच्या बागांसह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची आमदार सुहास बाबर यांनी भेट घेऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी केली. या भेटीदरम्यान खानापूर, आटपाडी आणि तासगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील परिस्थितीची सविस्तर माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली. गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे झालेले नुकसान आणि कोलमडून पडलेली पिके यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. यावेळी आमदार श्री. बाबर यांनी
नुकसानग्रस्त भागाचे प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करण्यात यावेत. बाधित शेतकऱ्यांना कोणताही विलंब न लावता लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी ठोस पावले उचलावीत. समस्या ऐकून घेतल्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शासनाकडून नियमानुसार योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
إرسال تعليق