तासगाव:येथील कापूर ओढा स्मशानभूमी परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने रंगेहात पकडले. रोहित राजू जाधव (वय २४, रा. एम. एस. ई. बी. पाठीमागे, सिद्धेश्वर कॉलनी, तासगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दीड किलो गांजा आणि एक दुचाकी जप्त केली आहे.
स्मशानभूमी परिसरात लावला सापळातासगाव शहरात एलसीबीचे पथक गस्त घालत असताना, कापूर ओढा येथील स्मशानभूमीजवळ एक इसम गांजा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने या परिसरात सापळा रचला. संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या रोहित जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्या पिशवीची झडती घेतली असता, त्यात दीड किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करून आरोपीला तासगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईपोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री, साठा आणि तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या विशेष पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
إرسال تعليق