आटपाडी तालुक्यात सुरू असलेल्या टेंभू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन कामामध्ये मोठ्या प्रमाणात बोगसगिरी करून भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते ब्रम्हानंद पडळकर यांनी केला. टेंमुच्या पाईपलाईनच्या चरीमधुनच शेतकऱ्यांच्या खासगी पाईपलाईन टाकणे, वितरिकी-आऊटलेट, व्हॉल्वची कामे अपूर्ण असतानाही बिले काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
आटपाडी येथे टेंभु कार्यालयाला भेट देवुन माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर व कार्यकत्यांनी सहा. कार्यकारी अभियंता अमृत सांगळे व इतरांना जाब विचारला. दिघंची ते निंबवडे मार्गावरील टेंभूच्या पाईपलाईन कामाची आम्ही पाहणी केली आहे. त्यावेळी धक्कादायक बाबी उजेडात आल्या. अनेक ठिकाणी केंड लाईनचे वॉल, डंबरी व कॉक्रिटीकरण अशी कामे
झालेलीच नाहीत. ही कामे अपूर्ण असताना त्याची अधिकारी व ठेकेदाराने संगनमताने बिले काढली आहेत. एकाच लाईनवरच २२ ते २५ ठिकाणी असा प्रकार निदर्शनास आला आहे. ही कामे न करता शेतकऱ्यांना पाणी जाण्याची वितरण व्यवस्था न करता ठेकेदार व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी ब्रम्हानंद पडळकर यांनी केली.
तसेच ही कामे ज्यांच्या कार्यकाळात झाली ते अधिकारी शिवाजी पाटील यांनाही पडळकर यांनी भ्रमणध्वनीवरून खड्या माषेत जाब विचारत धारेवर थरले. पैसे घेवुन टॅमुच्या पाईपलाईनच्या चरीमधुन शेतकऱ्यांच्या खासगी पाईपलाईन टाकल्याचा आरोपही पडळकर यांनी केला. झरे येथील पाईपलाईनची छायाचित्रेही त्यांनी सादर केली. संबंधित घटनेची पाहणी केली असुन टेंभु उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग तासगाव यांच्यावतीने संबंधित शेतकरी रंगनाथ कटरे (पारेकरवाडी) यांना सहा. कार्यकारी अभियंत्यांनी नोटीस दिल्याचे आटपाडीचे सहा. कार्यकारी अभियंता अमृत सांगळे यांनी सांगितले. याबाबत तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करून टेंभुच्या बंदिस्त पाईपलाईनच्या न झालेल्या कामांचे बिल काढण्याच्या उद्योगाची माहिती द्यावी, अशी मागणी केली. दोषी टेंभुचे अधिकारी व ठेकेदारावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.
Post a Comment