⚡ ब्रेकिंग News

पोलिसांनी खुनाचा नवा पॅटर्न जन्माला घातलाय!'; खासदार विशाल पाटील यांचे पोलिसांवर गंभीर आरोप

सांगली / प्रतिनिधी:मिरज तालुक्यातील हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांचा १४ वर्षांचा निष्पाप नातू वेदांत बंडगर याच्या निर्घृण हत्याकांडाने सांगली जिल्हा हादरला असतानाच, आता या प्रकरणात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी काल घेतलेल्या धडाकेबाज पत्रकार परिषदेत सांगली पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. "गुन्हेगारी जगतात पोलिसांचा एक नवा पॅटर्न सुरू आहे, ज्यामध्ये मूळ आरोपीला वाचवण्यासाठी एका गरीब घरातील अल्पवयीन मुलाला खोटा आरोपी म्हणून उभे केले जाते," अशी घणाघाती टीका खासदार विशाल पाटील यांनी केली आहे.
ते म्हणाले, "सांगली पोलीस दलात सध्या एक अशी गँग सक्रिय आहे जी गंभीर गुन्ह्यांमध्ये पैशांचा मोठा बाजार मांडून बसली आहे. एखादा मोठा गुन्हा किंवा खून झाला की, मुख्य आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आरोपीला वाचवण्यासाठी एखाद्या गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलाला शोधले जाते. त्याला पैशांचे आमिष दाखवून तो गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यास भाग पाडले जाते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, "हा अल्पवयीन मुलगा पुढे बालसुधारगृहात जातो. कायद्याच्या पळवाटांमुळे तो वर्ष-सहा महिन्यांत बाहेर येतो आणि मूळ आरोपी मात्र समाजात उजळ माथ्याने फिरत राहतो. या माध्यमातून पोलिसांमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार सुरू आहे.
सदार पाटील यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "पोलीस यंत्रणेत वरपासून खालपर्यंत प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी कोट्यवधी रुपये मोजले जात आहेत. इतके पैसे देऊन येणारे अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार? सांगलीतील पोलीस ठाणी पूर्णपणे विकली गेली असून प्रत्येक ठाण्यात एक हक्काचा वसुलीदार कर्मचारी नेमलेला आहे," असा घणाघात त्यांनी केला.
वेदांत बंडगरच्या खुनाच्या दिवशी पोलीस यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करत होती, असा सवाल त्यांनी केला. "वेदांतचा खून झाला त्या दिवशी स्थानिक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपअधीक्षकांना (DySP) कोणाकोणाचे फोन आले होते, त्याचे कॉल डिटेल्स (CDR) जनतेसमोर आले पाहिजेत. मुख्य संशयित आरोपी लोकसभेला कोणत्या पक्षाचे आणि कोणाचे काम करत होता, हे संपूर्ण सांगलीला ठाऊ.
क आहे. त्यामुळे या गुन्हेगारांना कोणाचे राजकीय वरदहस्त लाभले आहेत, याचे उत्तर थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे," अशी आक्रमक मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...