⚡ ब्रेकिंग News

अध्यक्ष निवडीलाी सोबत न गेल्यामुळे पडळकर यांच्याकडून बिनबुडाचा आरोप : तानाजीराव पाटील

आटपाडी ता.31-जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीत त्यांच्यासोबत गेलो नाही म्हणून गोपीचंद पडळकर यांनी कुणबी दाखल्यावर खोटा आरोप केला आहे. जात पडताळणी समितीने कुणबीच्या दाखल्याची पडताळणी करून पडताळणी प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी दिली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिघंची गटाचे कुणबीतून निवडून आलेले पृथ्वीराज पाटील यांच्या कुणबी दाखल्यावर आक्षेप घेतला आहे. याला जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले,"गोपीचंद पडळकर विकृत मनोवृत्तीची व्यक्ती आहे. प्रत्येकाने त्यांच्या मनाप्रमाणे वागावे असा अट्टाहास असतो. कोणीही त्यांच्या विरोधात गेलेले चालत नाही. अध्यक्षपदाच्या निवडीला आम्ही सोबत गेलो नाही. म्हणून त्यांचा हा पोटसूळ उठला आहे. त्यांच्याविरोधात विद्या मोटे यांनी निवडणूक लढवली. तर आटपाडीत बाळासाहेब हजारे यांनी नगरपंचायतीची निवडणूक लढवली. या दोघांनी लढवलेली निवडणूक त्यांना रुचली नाही म्हणून त्यांनी चार दिवसांपूर्वीच त्यांच्या व्यवसायावरती खोटे आरोप केले. असाच प्रकार अमरसिह देशमुख यांच्या बाबतीतही केला होता. सूतगिरणीच्या व्यवहारावर आरोप केले. आता देशमुख त्यांच्यासोबत गेल्याने हे आरोप गुंडाळून ठेवले. असाच काहीसा प्रकार आमच्या बाबतीत आहे.". कुणबीचा दाखला काढून त्याची जात पडताळणी झाली आहे. ते प्रमाणपत्र जिल्हा परिषदेत जमा केले आहे. पडळकरानी समितीकडे जाऊन गोंधळ घातला होता. अधिकाऱ्यांना दम दिले. आम्ही समितीकडे लेखी जबाब दिलेले आहेत. तसेच न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. केवळ पडळकर म्हणले म्हणून पडताळणी प्रमाणपत्र रद्द होत नाही. पडळकर यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. हे संपूर्ण राज्याला माहिती झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...