सांगली / प्रतिनिधी:"सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून पोलीस यंत्रणा सध्या सत्ताधारी किंवा बड्या नेत्यांच्या दबावाखाली काम करत आहे," असा घणाघाती आरोप रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी काल सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. १४ वर्षीय वेदांत बंडगर या शाळकरी मुलाच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला.पत्रकार परिषदेत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, "या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. घटनेच्या वेळी आणि त्यानंतर स्थानिक पोलीस निरीक्षक कोळेकर यांना कोणाकोणाचे फोन आले होते, याचे कॉल डिटेल्स (CDR) तपासले जावेत. पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे यातून स्पष्ट होईल.हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आणि दबावाखाली काम केल्याबद्दल पोलीस निरीक्षक कोळेकर यांना तातडीने निलंबित करावे, अशी आक्रमक मागणी खोत यांनी यावेळी केली. निष्पाप वेदांतच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
'वेदांत बंडगर हत्या प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव?'; सदाभाऊ खोत
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment