⚡ ब्रेकिंग News

अंतर-विभागीय तायक्वांदो स्पर्धेत श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे वर्चस्व; ३ सुवर्ण पदकांसह पटकावले सर्वसाधारण विजेतेपद!

आटपाडी ता. 25- कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे पार पडलेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत 'अंतर-विभागीय तायक्वांदो स्पर्धेत' आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाने देदीप्यमान यश संपादन केले. महाविद्यालयाच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण आणि १ कांस्य पदक जिंकून स्पर्धेचे 'सर्वसाधारण विजेतेपद' पटकावले. या विभागीय तायक्वांदो स्पर्धेत 
सागर साळुंखे यांने 54 किलो वजनी गटात सुवर्णपदक, आदित्य शिंदे यांने 58 किलो वजनी गटात सुवर्णपदक, हर्षवर्धन सागर यांने 74 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले तर
कुणाल काळेबाग यांने 68 किलो वजनी गटात कांस्यपदक पदक मिळवले.
सुवर्णपदक विजेत्या सागर साळुंखे, आदित्य शिंदे आणि हर्षवर्धन सागर या तिघांचीही पंजाबमधील जालंधर येथे होणाऱ्या 'अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेसाठी' शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील तीन खेळाडू राष्ट्रीय स्तरावर लवकरच खेळणार आहेत. या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गौरव चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू नाथा पवार आणि क्रीडा शिक्षक हणमंत माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या ऐतिहासिक यशाबद्दल आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख, संस्थेचे सचिव पवार, निरीक्षक चौगुले, प्रकाश नामदास, ए.के. गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी सर्व खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. 

3 Comments

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...