खरसुंडी (प्रतिनिधी) : श्री.
सिद्धनाथ देवस्थान खरसुंडी ट्रस्टच्या कारभारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत आपणच हा प्रकार बाहेर काढल्याचे स्पष्टीकरण सामाजिक कार्यकर्ते शेखर निचळ यांनी दिले. आटपाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी अर्जुन पुजारी, राहुल गुरव, विवेक पुजारी, सुनील पाटील, गणेश पुजारी आदी उपस्थित होते.
शेखर निचळ म्हणाले की, सार्वजनिक ट्रस्ट असल्यामुळे कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला ट्रस्टच्या कामकाजाबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. मात्र, ट्रस्टकडून मूळ प्रश्नांना बगल दिली जात असून पारदर्शकतेचा अभाव स्पष्ट दिसत आहे. विशेषतः १८१ किलो चांदी नेमकी कुठे गेली, याबाबत ट्रस्टकडून स्पष्ट उत्तर दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
देवस्थानला भाविकांकडून मिळालेल्या दानाची योग्य नोंद ठेवली गेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. आजपर्यंत आलेल्या गुप्तदानाची कोणतीही अधिकृत नोंद नाही. हे अत्यंत गंभीर असून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान आहे, असे निचळ यांनी स्पष्ट केले. तसेच, एकूण ३२० किलो चांदी कोणत्या भाविकांनी दिली, याची
आटपाडी : श्री सिद्धनाथ देवस्थान खरसुंडी ट्रस्टच्या भ्रष्टाचार बाबत पत्रकार परिषदेला उपस्थित शेखर निचळ, राहुल गुरव, अर्जुन पुजारी
संपूर्ण यादी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय, दरवर्षी सुमारे २५० ग्रॅम सोने देवस्थानाला दान स्वरूपात मिळत असताना त्याचीही व्यवस्थित नोंद केली गेली आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. बालाजी दत्तात्रय देवकर या भाविकाला चांदी परत दिल्याचा आरोप करत, दान केलेली वस्तू परत देता येत नाही, असा कायदा असताना हा प्रकार कसा घडला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ट्रस्टने १८१ किलो चांदीची अफरातफर केली असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या आरोपांमुळे खरसुंडी ट्रस्टच्या कारभाराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्येही नाराजीचे सूर उमटत आहेत. या प्रकरणी ट्रस्टकडून अधिकृत स्पष्टीकरण येणे अपेक्षित असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
إرسال تعليق