⚡ ब्रेकिंग News

माणदेशी मातीचा हिरा चमकला! आटपाडीच्या प्रवीण कोळपे यांची UPSC परीक्षेत मोठी भरारी

अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर माणदेशी मातीतील एका सुपुत्राने दिल्लीच्या तख्तावर आपले नाव कोरले आहे. आटपाडी तालुक्यातील मिटकी गावचे सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशात ५८४ वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात आणि विशेषतः आटपाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
संघर्षातून यशाचे शिखर:
ग्रामीण भागात राहून, कोणत्याही मोठ्या सुविधांची उपलब्धता नसतानाही प्रवीण यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास केला. 'माणदेशी मातीचा हिरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवीण यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शकांना दिले आहे. त्याचे वडील उत्तमराव कोळपे यांचे निधन झालेले आहे. सध्या आई वंदना कोळपे भाऊ प्रमोद कोळपे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून प्रवीण याला आर्थिक पडवळ देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. प्रवीण याचे छोट्याशा मिटकी गावातच प्राथमिक शिक्षण झाले आहे. तर माध्यमिक खरसुंडी सिद्धनाथ विद्यालय आणि उच्च माध्यमिक वेलिंग्टन कॉलेज सांगली येथे शिक्षण घेतले त्यानंतर कराड येथे सहा वर्षाचे उच्च शिक्षण घेतले. मिटकी सारख्या छोट्या गावातून येऊन UPSC सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणे, ही भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरली.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...