सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीता राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन जिल्हा परिषद सदस्य फुटले होते. या तीन जिल्हा परिषद सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करण्याऐवजी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसनं अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काढलेल्या व्हिपचं उल्लंघन झालं होतं. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांवर अपात्रतेची कारवाई सुरु करण्यात आली आहे. यामुळं कामेश कांबळे, ऋतुजा जगताप, लता कर्णे अडचणीत आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. व्हिप मोडून मतदान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. : राष्ट्रवादीकडून तीन जणांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या दरम्यान 'व्हिप'चे उल्लंघन केल्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या कामेश कांबळे,ऋतुजा जगताप, लता कर्णे या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचं ॲड.दत्तात्रय घोडके यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचे व्हिप उल्लंघन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते उदय कबुले यांच्या वतीने ही कायदेशीर लढाई सुरू करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व सदस्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला मतदान करण्याचा 'व्हिप' जारी केला होता. मात्र, पक्षाचा आदेश डावलून तीन सदस्यांनी स्वतंत्र भूमिका घेत भाजप च्या उमेदवाराला मतदान केले. यामुळे 'महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता अधिनियम'नुसार या सदस्यांना अपात्र ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेण्यात आली आहे.ॲड. दत्तात्रय घोडके यांनी तीन सदस्यांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली असल्याची माहिती दिली असून यामध्ये राष्ट्रवादीचे कांबळे,ऋतुजा जगताप, लता कर्णे यांचा समावेश आहे. या प्रकरणांमध्ये सहा महिन्यांच्या आत निर्णय घेणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी लवकरच संबंधितांना नोटीस बजावतील आणि दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो न्याय देतील,असा विश्वास ॲड .दत्तात्रय घोडके व्यक्त केला आहे.
Post a Comment