⚡ ब्रेकिंग News

स्मृतीसोबत परत नातं जुळणार तोच पलाशला मोठा धक्का! सांगलीमध्ये गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय.

सांगली : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि स्मृती मंधानाचा एक्स बॉयफ्रेंड पलाश मुच्छल गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आला आहे. स्मृतीसोबतचं त्याचं लग्न मोडल्यानंतर त्याच्यावरील अडचणी संपण्याचं नाव घेत नाही आहेत. पलाश मुच्छल आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'नजरिया' नावाचा चित्रपट काढतोय असं सांगून त्याने सांगलीतील एका व्यापाऱ्याकडून लाखो रुपये उकळले आणि पैसे परत मागितल्यावर चक्क जातीवरून हिणवून अपमान केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात पलाश मुच्छल विरोधात ॲट्रॉसिटीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, सांगलीत या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील ३४ वर्षीय तरुण व्यापारी विज्ञान प्रकाश माने यांची आणि पलाश मुच्छलची एका समारंभात ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत पलाशने आपण 'नजरिया' नावाचा चित्रपट दिग्दर्शित करत असल्याचं सांगितलं. चित्रपटात २५ लाख गुंतवा, चित्रपट ओटीटीवर आला की तुम्हाला ३७ लाख मिळतील," असं आश्वासन पलाशने माने यांना दिलं. इतकंच नाही, तर चित्रपटात अभिनयाची संधी देण्याचं गाजरही त्याने दाखवलं होतं.पलाशच्या शब्दावर विश्वास ठेवून विज्ञान माने यांनी सप्टेंबर २०२४ मध्ये नवकृष्णा व्हॅली परिसरात चित्रपटाचे शुटींग सुरू असताना पलाशला २० लाख रुपये रोख दिले. त्यानंतर पुन्हा ५ लाख आणि पुढे एडिटिंगच्या नावाखाली वेळोवेळी ऑनलाईन पैसे पाठवले. मात्र, दोन महिने उलटले तरी चित्रपटाबाबत कोणतीही हालचाल दिसत नसल्याने माने यांनी आपल्या पैशांचा तगादा लावला. आपल्या कष्टाच्या पैशांची फसवणूक आणि जातीवरून झालेल्या अपमानानंतर विज्ञान माने यांनी सांगली शहर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर पलाश राजकुमार मुच्छलविरोधात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम म्हणजेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...