⚡ ब्रेकिंग News

भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी आमदार गोपीचंद पडळकर

मुंबई - आपल्या धारदार भाषणांनी विरोधकांना घाम फोडणारे जतचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या नव्या कार्यकारिणीत पडळकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपला नवा 'बुलंद आवाज' मिळाला आहे. 
गोपीचंद पडळकर यांची ओळख केवळ एक आमदार म्हणून नाही, तर 'आंदोलक नेता' म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा असो, एसटी कर्मचाऱ्यांचा संप असो वा शेतकऱ्यांच्या समस्या, पडळकर नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. त्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांपासून ते थेट रस्त्यापर्यंत दिलेले लढे आणि विरोधकांच्या नाकी नऊ आणणारी त्यांची आक्रमक भाषणे ही त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य ठरली आहेत. त्यांच्या याच झुंजार वृत्तीची आणि हिंदुत्ववादी विचारांची दखल घेत पक्षाने त्यांना ही महत्त्वाची संधी दिली आहे.   
पडळकर यांनी गेल्या काही काळात ज्या पद्धतीने पक्षवाढीसाठी काम केले आणि कार्यकर्त्यांचे मोठे संघटन उभे केले, त्या संघटन कौशल्याचा उपयोग आता संपूर्ण राज्यासाठी केला जाणार आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात भाजपची पकड अधिक घट्ट करण्यासाठी त्यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. प्रस्थापित नेत्यांविरुद्ध दंड थोपटून उभे राहण्याचे त्यांचे धैर्य भाजपसाठी आगामी निवडणुकांत महत्त्वाची 'रणनीती' ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...