⚡ ब्रेकिंग News

,,,तर रस्त्याच्या कामासाठीा शुभेच्छा - तानाजीराव पाटील यांचा विरोधकाना टोला

आटपाडी - शहरात बसस्थानक ते शेटफळे चौक रस्त्याच्या कामावरून भाजप आणि शिवसेनेत वाद पेटला आहे. या पार्श्वभूमीवर सेनेचे तानाजीराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत रस्त्याचे काम करताना रुंदीकरणाचा विचार केला गेला नाही, तर शहराच्या विकासाला खिळ बसेल, असा इशारा दिला. प्रशासन आणि ठेकेदारांनी काम सुरू ठेवावे. त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोलाही श्री. पाटील यांनी  पत्रकार बैठकीत लावला.    यावेळी त्यांनी काम करताना १० मीटर रुंदीचा प्रस्ताव असला, तरी जेवढे शक्य आहे तेवढे रुंदीकरण व्हावे, अशी भूमिका जाहीर केली. ते म्हणाले,"साईमंदिर
 ते बस स्थानक रस्ता 14 मीटरने केला. तर आण्णाभाऊ साठे चौक ते बाजार पटांगण मार्गावर कॉलेज सुटल्यावर  मोठी गर्दी होते आणि रहदारी वाढते. त्यामुळे अडचणी टाळण्यासाठी
सतरा मिटरने रस्ता केला. त्याला नागरिकांनी सहकार्य केले. भाजपाचे  ब्रम्हानंद पडळकर यांनीही प्रत्यक्ष पाहणी करून वाढती वाहतुक लक्षात घेऊन रस्ता रूंदीकरणाची गरज मान्य आहे. श्री. पाटील म्हणाले,"रस्ता रुंदीकरण झाले नाही, तर बस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. वाहतूक कोंडी वाढेल आणि नागरिक पर्यायी मार्गांचा वापर करतील. काही मोजक्या दोन-चार व्यापाऱ्यांना तात्पुरते मानसिक समाधान मिळेल मात्र उद्या त्यांच्याच पुढे वाहतूक कोंडीचे प्रश्न निर्माण होऊन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. कोणाच्याही इमारती पाडून काम केलेले नाही. संपूर्ण रस्त्यावर पाचशे पैकी दोन चार व्यापारी नाराज झालेत.   विरोधकांचा शहराला खरोखरच डबऱ्यात
घालण्याचा' प्रयत्न चालला केला. त्यांनीही त्यांच्या अंतर्मनाचा आवाज ऐकावा. शहर मोठे होण्याची स्वप्ने पाहायची असतील, तर पायाभूत सुविधांमध्ये तडजोड चालत नाही. शहर आणि व्यापार विस्तार लक्षात घेता रस्ता मोठा हवा. तरीही विरोधकाना अरुंद रस्ता मान्य असेल तर प्रशासनाने काम सुरू करावे. त्याला शुभेच्छा आहेत.  मात्र  भविष्यात अडचणी निर्माण झाल्यावर त्यांना माझीच आठवणार
येणार हे नक्की आहे. अकरा मीटरमुळे दोन चार व्यापाऱ्यांचे तात्पुरते समाधान होतील. पण ते जास्त काळ टिकणारे नाही.
 आतापर्यंतचा रस्ता नागरिकांना सोबत घेऊन केला असून त्यांना त्रास झाला नाही. चाळीस पन्नास वर्षाचा विचार करुन रस्ता मोठा केला तर व्यापा-यांना चाळीस वर्ष व्यवसाय चांगला चालेल असा दावा केला.                                 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...