⚡ ब्रेकिंग News

सांगोल्यातीला ठिय्या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष


सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील मागासवर्गीय ठेकेदारांचे १७ फेब्रुवारी पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची प्रशासनानेच अद्याप दखल न घेतल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटली आहे. 
      अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेतील कामे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मागासवर्गीय मजूर सहकारी संस्था यांना शासन नियमानुसार कामे न देता जाणिवपूर्वक जातीवाद करून दलित वस्तीतील सदरची विकास कामे विनापरवाना ग्रामपंचायत व इतरांना संगनमताने दिली आहेत. त्यामुळे 17 फेब्रुवारीपासून पंचायत समिती समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. यात अभियंता  बळीराम मोरे , विजय बनसोडे, इंजि. अजय कांबळे, इंजि. शंतनु बनसोडे, शेखर गडहिरे, श्रीमती सखुबाई वाघमारे, युवराज कांबळे, मल्हारी मोरे आदी बेमुदत धरणे आंदोलन करीत असून सदर आंदोलनास स्वाभिमानी धनगर समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील,नुतन जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, आर.पी.आय.चे तालुका अध्यक्ष खंडू सातपुते तसेच तालुक्यातील विविध संस्था, संघटनांकडून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र गेली नऊ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाचा सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...