⚡ ब्रेकिंग News

आटपाडीत किरीट सोमय्यांचा शिवप्रेमींकडून तीव्र निषेध

आटपाडी -भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आटपाडी नगरपंचायतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून घोषणाबाजी केलेल्या घटनेचे शहरभर तीव्र पडसाद उमटले आहे. शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. तसेच   सोमय्यांचा यांचा जोरदार निषेध नोंदवला.                  किरीट सोमय्या हे शुक्रवारी आटपाडी नगरपंचायतीमध्ये जन्म-मृत्यूच्या नोंदींची पडताळणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी नगरपंचायतीसमोर असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. मात्र, हार अर्पण केल्यानंतर त्यांनी थेट महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून घोषणा दिल्या. या कृतीमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. चारित्र्यहीन व्यक्तीने महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात ठेवून अवमान केल्याची संतापजनक भावना शिवप्रेमींनी व्यक्त केल्या.‌त्यांनी सोमय्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. घटनेची माहिती मिळताच शहरातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यांनी किरीट समजा यांचे हात महाराजांच्या पुतळ्याला लागल्याने पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून पुतळ्याचे पावित्र्य राखले. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि ती फाडून निषेध करण्यात आला. निषेधाच्या शिवप्रेमींनी जोरदार घोषणा दिले. यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी  "किरीट सोमय्या यांनी या गैरवर्तनाबद्दल जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही फिरू दिले जाणार नाही." तसेच, जिथे सोमय्या जातील तिथे शिवप्रेमींनी त्यांचा निषेध करावा, असे आवाहनही केले.
या आंदोलनाप्रसंगी मोहनराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, संतोष पाटील, शरद पवार, नगरसेवक अमरसिंह पाटील, मनोज देशपांडे, पोपट पाटील, यल्लपा पवार, मनोज नांगरे, उत्तम पाटील, अभिजित देशमुख यांच्यासह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते.          

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...