आटपाडी - आटपाडी पंचायत समितीच्या निवडणूकीत मतदारांनी ऐतिहासिक सत्तांतर घडवले. गतवेळी निर्विवाद वर्चस्व मिळवलेल्या भाजपाकडून शिवसेनेने सत्ता ताब्यात घेतली.यावेळी एकी सदस्य नसलेल्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत पाच सदस्य निवडून आणले तर भाजपाचे तीन सदस्य निवडून आले आहेत. गत वेळी भाजपाचे सहा सदस्य होते यावेळी त्यात तीन सदस्यांनी घट झाली तर शून्यावरून शिवसेनेने पाच सदस्यापर्यंत जोरदार मुसंडी मारली. पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण सर्वसाधारण आहे. शिवसेनेचे बहुमत असल्याने त्यांचा सभापती होणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान शिवसेनेचे नूतन पंचायत समिती सदस्य दिलीप हेगडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले. तरीही शिवसेनेचे चार आणि भाजपाचे तीन सदस्य असल्याने शिवसेनेची सत्ता आणि सभामती होणार हे निश्चित झाले आहे. सभापती पदाच्या स्पर्धेत करगणी पंचायत समिती गणाचे सदस्य दत्तात्रय पाटील यांचे आघाडीवर नाव आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या करगणी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पदाची निवडणूक त्यांच्या पत्नीने लढवली होती. त्यावेळी त्यांचा निसटच्या मताने पराभव झाला होता. यावेळी मात्र ते विक्रमी 2800 मताधिक्याने निवडून आले आहेत. पत्नीचा झालेला पराभव आणि त्यांच्याबद्दल असलेली सहानुभूती यामुळे त्यांचे नाव सभापतीपदासाठी आघाडीवर असणार आहे. याशिवाय खरसुंडी गणाच्या उच्चशिक्षित सदस्य डॉ. मीनाक्षी पुजारी यांचे नावे चर्चेत आहे. पंचायत समितीवर पहिल्यांदा शिवसेनेची सत्ता आली आहे. त्यामुळे शिवसेनेचा पहिला सभापती आणि उसभापती पदावर कोणाची वर्णी लागते याकडे साऱ्यांची लक्ष लागले आहे.
आटपाडीचा नवा 'कारभारी' कोण? सभापती निवडीचा मुहूर्त ठरला; 'या' नावांची जोरदार चर्चा
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment