⚡ ब्रेकिंग News

बाप गमावल ,ा आईने मजुरी केली पण पट्ट्याने जिद्द नाही सोडली, करून दाखवल

आटपाडी ता. 6- जिद्द असेल तर आभाळही ठेंगणं असतं," हे आटपाडी तालुक्यातील मिटकी गावच्या प्रवीण उत्तम कोळपे याने सिद्ध करून दाखवलं आहे. हजार-बाराशे लोकसंख्येच्या छोट्याशा गावातील या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 584 वी रँक मिळवून यशाचं शिखर सर केलं आहे. बाप गमावला आणि आईने मजुरी केली पण पट्ट्याने जिद्द सोडली नाही. प्रवीणच्या या यशाने केवळ मिटकी गावच नव्हे, तर संपूर्ण सांगली जिल्हा अभिमानाने भारावून गेला आहे. प्रवीणचे प्राथमिक शिक्षण मिटकीतच झाले. जेमतेम हजार बाराशे लोकसंख्या असलेले गाव. गावात प्राथमिक शाळेची सोय आहे. माध्यमिक शिक्षणासाठी त्याला खरसुंडीच्या श्री. सिद्धनाथ विद्यालयात रोज पायी जावे लागल होते. त्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यानंतर सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक आणि आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातून त्याने बीएससी पूर्ण केली. पदवी घेतानाच त्याने कलेक्टर होण्याचे स्वप्न वडिलांनी बघीतले होते. त्यासाठी वडिलांनीच आग्रह धरून दिल्लीला अभ्यासाची पाठवले. ते स्वप्न उराशी बाळगून प्रवीणे अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीला एक वर्ष दिल्लीला गेले. तिथे खाजगी शिकवण्या लावल्या. प्रचंड अभ्यास केला. प्रवीणचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. दरम्यान,2021 मध्ये त्याच्या वडिलांचे छत्र हरपले. घराचा मोठा मुलगा म्हणून जबाबदारी खांद्यावर होती आणि वडील गेल्याचे दुःख डोंगराएवढे होते. पण, मुलाने साहेब व्हावं हे वडिलांचं स्वप्न आईने डोळ्यात साठवलं होतं. मुलाने शिकावं मोठं व्हावं असे वडिलांचे स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी आईने निर्धार केला. स्वतःच्या शेतात राबून आणि लोकांच्या शेतात मोलमजुरी करून आईने मुलाच्या शिक्षणासाठी पै-पै जमा केली. अनेकदा उसनवारी करून, अडचणी सोसून आईने प्रवीणला प्रोत्साहन दिले. दिल्लीत अभ्यासासाठी गेल्यावर खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता, म्हणून प्रवीण डगमगला नाही. तो माघारी आला आणि कराडमध्ये स्वतःचा अभ्यास सुरू ठेवला. सहाव्या प्रयत्नात त्याला यश आले. गेल्या वेळी मुलाखती कमी गुण मिळाले होते. मात्र गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या तपश्चर्येचे अखेर फळ मिळाले असून प्रवीण आता देशाच्या प्रशासकीय सेवेत दाखल होणार आहे. प्रवीणच्या निवडीचे वृत्त समजताच मिटकी येथे प्रवीण, आई आणि आजीला पेढे चारून आणि सत्कार करून आनंद उत्सव साजरा केला. तसेच परिसरात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. "माझ्या आईच्या कष्टाचं चिज आणि आई वडिलांच्या स्वप्न आज पुर्ण झालं," अशी भावना प्रवीणने व्यक्त केली. 

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...