⚡ ब्रेकिंग News

आटपाडी नगरपंचायतीचे कारभारी स्वच्छता मोहिमेत उतरले

आटपाडी नगरपंचायत आटपाडी यांच्या वतीने रामनवमीनिमित्त हाती घेतलेल्या उपक्रमांतर्गत आज शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे अनेक परिसर स्वच्छ करण्यात आले.

या उपक्रमात आटपाडीचे नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवला.

स्वच्छ, सुंदर आणि निरोगी आटपाडी घडविण्यासाठी सर्वांनी मिळून केलेले हे प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरत आहेत.बुद्ध विहार, ऐवळे गल्ली, कोष्टी गल्ली, कल्लेश्वर मंदीर परिसर, मुख्य बाजारपेठ , देशमुखगल्ली , बाजारपटांगण येथील स्मशानभूमी आदी ठिकाणांची स्वच्छता 
नगराध्यक्ष यु .टी . जाधव सर , मुख्याधिकारी वैभव हजारे साहेब , उपाध्यक्षा मिनाक्षी पाटील , स्वच्छता व आरोग्य सभापती संध्या पाटील , गटनेते ऋषीकेश देशमुख , अमरसिंह देशमुख, सामाजिक कार्यकर्ते महेशकुमार पाटील , नगरसेवक महेश देशमुख , पै अजित जाधव, संतोष लांडगे, डॉ जयंत पाटील, शरद पाटील, दत्ता चव्हाण , शशिकांत दौंडे , आबासाहेब नांगरे, सोमेश्वर भिंगे, संगम डोंबे , तसेच डी एम पाटील सर, आटपाडी भाजपा सरचिटणीस आनंदराव देशमुख, शहराध्यक्ष विकास भुते, किसान सभा अध्यक्ष बाळासाहेब मेटकरी, जीवन कासार, शैलेश ऐवळे , पुंदे साहेब , परीट मॅडम , सदाकळे मॅडम ,बाळासाहेब खंदारे , यांच्यासह नागरिक कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...