⚡ ब्रेकिंग News

सभापतिपदी सुवर्णा भोसले, उपसभापतिपदी सुहास शिंदेखानापूर


विटा : खानापूर पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतिपदाच्या आज झालेल्या निवडीत सभापतिपदी शिवसेना शिंदे गटाच्या घानवडच्या सुवर्णा भोसले, तर उपसभापतिपदी बेणापूरच्या सुहास शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी म्हणून प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल व सभेचे सचिव म्हणून गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी काम पाहिले.
खानापूर पंचायत समितीच्या सदस्यपदाच्या आठपैकी आठ जागा मिळवत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली आहे. सुवर्णा प्रशांत भोसले यांचा सभापतिपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांना महेश आनंदराव घोरपडे हे सूचक होते. उपसभापतिपदासाठी सुहास मालोजीराव शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यांना तेजश्री प्रमोद लोखंडे या सूचक होत्या. निर्धारित वेळेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे अद्यापही निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी जाहीर केले. उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी सभापती व उपसभापतींचा सत्कार केला. सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास शिंदे यांनी पदभार स्वीकारला. गणपतराव भोसले, कृष्णात शिंदे, राजाभाऊ शिंदे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर, पंचायत समिती सदस्य रोशन जाधव, प्रतिभा शेंडे, पायल कदम, पांडुरंग खोत, संजय मोहिते, पांडुरंग डोंगरे, सदाशिव हसबे, दादासाहेब पाटील, पोपट माने, राजेश कदम, प्रकाश बागल, अभिजित कदम उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...