⚡ ब्रेकिंग News

सांगली : मविआ-शिंदेसेना एकत्र, सर्वाधिक जागा मिळूनही भाजपचा 'गेम', २१ वर्षांची पोरगी सभापती

मिरज पंचायत समितीत भाजपला धक्का
सभापतिपदी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर, उपसभापतिपदी शिवसेनेच्या ललिता शेजुळ
मिरज : मिरज पंचायत समितीमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला धक्का देत काँग्रेसने सभापतीपद पटकावले. त्यांचे अवघे तीन सदस्य निवडून आले आहेत. तीन सदस्याच्या जोरावर अवघ्या २१ वर्षे वयाच्या तन्वी कमलेकर या सभापतिपदी विराजमान झाल्या, तर उपसभापतिपदी शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांना संधी मिळाली. काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांनी भाजपच्या राणी भोरे यांचा १० विरुद्ध अकरा मतांनी पराभव केला.
सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या  भाजपला सत्तेपासून रोखण्यात प्रतिस्पर्धी पक्षांना यश आले. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाने एकत्र येत पंचायत समितीत सत्ता स्थापन केली. खासदार
विशाल पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिदि-म्हैसाळकर, शिवसेना शिंदे गटाचे महानगरपालिका क्षेत्राचे नेते मोहन वनखंडे, सिकंदर मुजावर यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या घटक पक्षांनी येथे एकत्र येत सत्ता स्थापन केली.
 निवडीला  २२ पैकी २१ सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, आघाडीतून तन्वी कमलेकर यांचा सभापतिपदासाठी व ललिता शेजुळ यांचा उपसभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकडून राणी भोरे यांचा सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला होता.
आघाडीतील काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना या घटक पक्षांचे ११ सदस्य या सभेला उपस्थित राहिले, तर भाजपचेही १० सदस्य या सभेला उपस्थित होते. आघाडीच्या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेस पक्षाचा सभापती, तर शिवसेना शिदे गटाचा उपसभापती निवडण्यात आला.
*नाट्यमय घडामोडी*.
पंचायत समितीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे 'किंगमेकर' च्या भूमिकेत होते. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष व शिवसेनेच्या नेत्यांची आघाडी सोबत जाण्याची भूमिका होती. मात्र शिवसेनेचे एक सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा सोमवारी सुरू झाली. शिवसेनेचे बुधगाव गणातील सदस्य पांडुरंग इंगळे यांचा फोन 'स्वीच ऑफ' होऊन त्यांच्याशी संपर्क तुटला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या प्रकरणी पोलिसांत धाव घेतली. सभापती निवडीवेळीही सदस्य इंगळे अनुपस्थित राहिले. त्यामुळे महाविकास आघाडीकडे ११, तर भाजपकडे त्यांचे दहाच सदस्य राहिले. भाजपच्या हाती येणारी सत्ता निसटून गेली.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...