⚡ ब्रेकिंग News

विनायक मासाळ यांचा "यु टर्न", संजय पाटील यांना धक्का

आटपाडी - करगणी जिल्हा परिषद गटातील नूतन सदस्य विनायक मासाळ यांनी पक्षाचा आदेश डावलून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी वेळी माजी खासदार संजय पाटील यांच्यासोबत महायुतीला मिळाले होते. नुकतेच त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र देशमुख आणि शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांच्यासोबत राहणार असल्याचे स्पष्टीकरण केले. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या यू टर्नची चर्चा रंगली आहे.                            सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड नुकतीच पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य निवडून आले होते. ज्यामध्ये करगणी जिल्हा परिषदे गटाचे पुन्हा एक मासाळ यांचा समावेश होता. राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेते मंडळींनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तसा पक्षाचे गटनेत्यांनी अध्यादेश काढला होता. दुसरीकडे विनायक मासाळ यांनी आटपाडी तालुक्यात शिवसेनेसोबत हात मिळवणी करून करगणी गटातून उमेदवारी केली. शिवसेनेच्या पाठिंबावर ते निवडून आले.      अध्यक्षपदाच्या निवडीत माजी खासदार संजय पाटील यांच्यासोबत श्री. मासाळ महायुती सोबत गेले होते.  त्याचे राजकीय वर्तुळ पडसाद उमटले होते.                  या साऱ्या पार्श्वभूमीवर श्री. मासाळ यांनी पत्रकार परिषदे घेऊन शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष होणार असल्यामुळे मी माहिती सोबत गेलो होतो असे स्पष्टीकरण केले आहे. ते म्हणाले,"मी राजेंद्र देशमुख आणि तानाजीराव पाटील यांच्यासोबत काम करणार आहे. भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही शिवसेनेचा अध्यक्ष होणार म्हणून मी तिकडे गेलो होतो." श्री मासाळ यांनी भूमिका स्पष्ट करून माजी खासदार संजय पाटील यांची साथ सोडून परत तानाजीराव पाटील यांच्यासोबत आलें आहेत. त्यामुळे या भूमिकेची पुन्हा चर्चा रंगली आहे. दरम्यान निवडीनंतर जयंत पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांनी विरोधी गटाची माहिती दिल्याबद्दल आभार मानले होते. आत्ता त्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...