⚡ ब्रेकिंग News

प्रणव गुरव यांची शिवसेनेच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदी निवड

आटपाडी : दिघंची ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि भाजपाचे कार्यकर्ते
प्रणव गुरव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनत प्रवेश केला. यावेळी त्यांची खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघाच्या विधानसभा निवडणूक प्रमुखपदी निवड जाहीर केली. या निवडीने प्रणव यांना शिवसेनेत मानाचे स्थान मिळाले आहे. प्रणव गुरव यांनी भाजपमध्ये युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाचे काम केले होते. दिघंची ग्रामपंचायत मध्ये सलग दोन वेळा ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिघंची गटातून ते भाजपमधून इच्छुक होते. मात्र भाजपाने त्यांना उमेदवारी डावली. त्यामुळे ते नाराज झाले होते. त्यातूनच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊ जिल्हा परिषदेला शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यानंतर मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार सुहास बाबर यांची उपस्थिती होती. याच वेळी त्यांची खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदी निवड जाहीर केली. आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी श्री गुरव यांची मतदार संघाच्या प्रमुख पदी निवड करून सन्मान केला. निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.दिघंची गटातून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि दोन्ही पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यात त्यांनी वाटा उचलला होता. त्यांनी भाजप पक्षातही अनेक महत्वपूर्ण पदांवर काम केले आहे. ते दुसऱ्यांदा दिघंची ग्रामपंचायतचे सदस्य झालेले आहेत. जाहीर आव्हान स्वीकारुनच त्यांनी दिघंची गावच्या चार नंबर प्रभागात माजी सरपंचाचा बालेकिल्ल्यात त्यांच्या मुलाचा पराभव केला होता. गेल्या दहा वर्षाच्या राजकारणाने त्यांची दिघंची आणि आटपाडी तालुका तरुणाई वर्गात फार मोठी लोकप्रियता आहे. यावेळी आमदार सुहास बाबर, जिल्हाप्रमुख संजय विभुते, दिघंचीचे माजी सरपंच अमोल मोरे, बाळासाहेब होनराव, दिलीप कीर्दत, जांभुळणीचे माजी सरपंच महादेव जुगदर, धीरज मोरे, आदित्य गुरव आदी उपस्थित होते. फोटो -1) मुंबई येथे भाजपाचे माजी कार्यकर्ते आणि दिघंची चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रणव गुरव यांची खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुख पदी निवडीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिले.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...