⚡ ब्रेकिंग News

वीज ग्राहकासाठी सोलरची ऊर्जा स्वस्त झाली

मुंबई: सौर ऊर्जा किलोवॅटच्या सौर प्रकल्पासाठी ६० पुरवठादारांकडून एका हजार रुपये आकारले जातात. मात्र, महावितरणच्या नव्या निर्णयानुसार नवा दर ४५ हजार ४५० रुपये केला आहे. एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत १५ हजार रुपयांनी कमी केली आहे.

कोणत्या वीज ग्राहकांसाठी आहे योजना ?प्रत्येक महिन्यात १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्रय रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महावितरणकडून मागवण्यात आलेल्या कंत्राटांमध्ये एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत १५ हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

एक किलोवॅटचा प्रकल्प ४५,४५० रुपयांतसध्या सौरऊर्जा पुरवठादारांकडून एक किलोवॅटच्या सौर प्रकल्पासाठी ६० हजार रुपये आकारले जातात. मात्र, महावितरणच्या नव्या निर्णयानुसार नवा दर ४५ हजार ४५० रुपये करण्यात आला आहे. ६० हजारांऐवजी ४५ हजार ४५० रुपयांत एक किलोवॅटचा छतावरील सौरऊर्जा प्रकल्प बसविता येत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आगामी काळात असे प्रकल्प बसविणाऱ्या सर्व गरजू ग्राहकांनाही योजनेचा लाभ घेणे सहज शक्य होईल, असा दावाही महावितरणकडून करण्यात आला.प्रत्येक महिन्यात शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्रयरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळण्यासाठी राज्य सरकारने स्मार्ट योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महावितरणकडून मागवण्यात आलेल्या कंत्राटांमध्ये एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाची किंमत १५ हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे. 

सूर्यघर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून घरगुती वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यासाठी एका किलोवॅटला ३० हजार रुपये, दोन किलोवॅटला ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅटला ७८ हजार रुपये थेट अनुदान मिळते. उर्वरित खर्च ग्राहकाने करायचा असतो. एका किलोवॅटच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. ग्राहकाच्या गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य येते आणि अतिरिक्त वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळवता येते.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...