⚡ ब्रेकिंग News

आटपाडी बाजार समिती पावणेतीन कोटीची कामे करणार

. आटपाडी ता.25- येथील बाजार समितीचे सभापती, उपसभापती आणि संचालक मंडळाच्या विशेष प्रयत्नातून पावणेतीन कोटींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती सभापती संतोष पुजारी यांनी दिली.
आटपाडी बाजार समितीने शेतकऱ्यांना अधिकाधिक सेवा संविधान देण्याच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांची गरज आणि मागणी लक्षात घेऊन या कामासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरवठा केला होता. आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या मुख्य आवारात पावणेतीन कोटीचे आधुनिक प्रकल्प राबवले जात आहेत. या कामाची सुरुवात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाणार आहे. या मध्ये डाळिंब संकुल भावनासमोर आणि परिसरात पावसाचे आणि गटारीचे असणारे पाणी लक्षात घेऊन एक कोटी पंधरा लाखाच्या बंदिस्त गटारीच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. तसेच आधुनिक डाळिंब पणन संकुल गाळ्यासमोरील संपूर्ण परिसर सुशोभीकरण करण्यासाठी पेव्हिंग ब्लॉक बसवले जाणार आहेत. आटपाडी तालुक्यात उसाचे आणि मक्याचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. मात्र विश्वासू वजन काटा नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. शेतकऱ्यांची गरज ओळखून आटपाडी आणि दिघंची उपबाजार आवारात प्रत्येकी ८० टन क्षमतेचे 53 लाख 54 हजार रुपयाचे 'वे-ब्रिज' (वजनकाटा) उभारला जाणार आहे. याशिवाय, दोन पॅक हाऊस अपुरे पडत असल्याने तिसरे पॅक हाऊससाठी मंजुरी मिळाली आहे.16 लाख 59 हजार रुपयाचे हेपॅक हाऊस बांधले जाणार असल्याची माहिती सभापती श्री. पुजारी यांनी दिली.
 ते म्हणाले,"केवळ सध्याची कामेच नव्हे, तर भविष्यातील नियोजनाचा आराखडाही तयार आहे. यात ३ कोटींचे दुसरे आधुनिक डाळिंब पणन संकुल, १ कोटीचे 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन', आणि २५ लाखाचे स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्याचे नियोजन आहे. तसेच ऊर्जेची बचत करण्यासाठी आटपाडी मुख्य आवारात 23 लाख आणि दिघंची येथे सुमारे 14 लाखाचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारली जाणार आहेत. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
"बाजार समितीचा संपूर्ण कायापालट करून राज्यात नावलौकिक मिळवण्याचे आणि शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावित सर्व बांधकामे लवकरच पूर्ण होतील," असा विश्वास सभापती संतोष पुजारी यांनी व्यक्त केला.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...