पुणे येथे “रक्षक होरायझन पब्लिक स्कूल” च्या भव्य इमारतीच्या कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संस्थेने शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू झाला असून, भविष्यात ही संस्था विद्यार्थ्यांच्या यशाचा मजबूत पाया ठरेल. हा सोहळा केवळ इमारतीची सुरुवात नसून, भविष्यातील पिढी घडवण्याच्या एका मोठ्या स्वप्नाची पायाभरणी असल्याची प्रतिक्रिया रणजितसिंह पाटील यांनी दिली.
“ज्ञानाची जोपासना, भविष्याची घडण” या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन या शैक्षणिक प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार, आधुनिक आणि सर्वांगीण शिक्षण देण्याचा संकल्प करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक आणि नैतिक विकासावर भर देत, त्यांना सक्षम आणि जबाबदार नागरिक बनवण्याचे ध्येय या संस्थेने ठेवले आहे.
यावेळी सोपान चव्हाण, हरिदास चरवड, सौ. धनश्रीताई कोल्हे, अश्विनीताई पोकळे (नगरसेविका, किशोर पोकळे, गोकुळ करंजावणे (सरपंच - किरकटवाडी), नरेंद्र हगवणे (उपसरपंच - किरकटवाडी), संदीप चव्हाण (उपसरपंच - धायरी),महेश घुले, विक्रम काटकर, यशवंतभाऊ कांबळे (उद्योजक, समृद्धी ग्रुप), पोपट पाटील, सिद्धार्थ भालेराव (आर्किटेक्ट) तसेच रक्षक परिवार, स्थानिक नागरिक उपस्थित होते.
ठिकाण - रक्षक होरायझन पब्लिक स्कूल पुणे.
रणजितसिंह पाटील.
एमडी : रक्षक ग्रुप, पुणे.
सुनिता पाटील.
डायरेक्टर : रक्षक ग्रुप
Post a Comment