नेलकरंजी: प्रशासनातील लोकसेवकांनी समाजातील गरजवंताना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन न्या. श्री पराग आवटे यांनी केले. मिटकी येथील नूतन आयपीएस अधिकारी प्रविण कोळपे यांचा आवटे-बाबर परिवारातर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी भारतीय वन सेवेतील अधिकारी प्रतिक इंदलकर तसेच प्रा. फडणीस आवटे यांनी उपस्थितांना भ्रमणध्वनीद्वारे मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून आवटे-बाबर परिवारातर्फे गुणवंताचा सन्मान करण्यात आला. यावेळी आटपाडी, आवटेवाडी तसेच खरसुंडी येथील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रविण कोळपे यांनी त्यांचा यशस्वी प्रवास उपस्थित मान्यवरांना उलगडून सांगितला.
यावेळी प्रा. पी. एन.आवटे यांनी प्रविण कोळपे यांचे अभिनंदन व सत्कार केला. याप्रसंगी प्रा.डॉ. पंकज आवटे , ॲड. प्रतिक पुजारी, सौ.मालन आवटे, ॲड. प्राजक्तादेवी आवटे, शेतकरी मार्केटचे संचालक सुभाष चोपडे, अक्षय चोपडे, आटपाडीचे अक्षय पाटील , प्रणय कदम, विवेक पुजारी आदी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत अक्षय पाटील यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सदर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
Post a Comment