आटपाडी तालुक्यात सध्या संपूर्ण नागरिकांच्या भावनांना ठेच लागणारा, असंतोषाला आग लावणारा आणि राजकीय वादळ उठवणारा प्रकार घडला असून, आटपाडी नगरपंचायत प्रशासनाविरोधात जनतेचा संताप रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. नगरपंचायत कार्यालयात प्रवेश करताना पूर्वी प्रथम दर्शनी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच अन्य महापुरुषांचे फोटो लावलेले असताना, ते अचानक हटवून त्या ठिकाणी थेट विद्यमान नगराध्यक्षांच्या नावाची पाटी झळकवण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष, चीड आणि द्वेषाची भावना पसरली आहे. हा प्रकार केवळ प्रशासनिक बदल नसून जनतेच्या श्रद्धेवर घाला, इतिहासाच्या सन्मानावर आघात आणि व्यक्तीपूजेचा उघड प्रयत्न असल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत. पाहणीदरम्यान हे स्पष्ट झाले की महाराजांचे व महापुरुषांचे फोटो काढून नगरपंचायतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बैठक कक्षात हलवण्यात आले, ज्या ठिकाणी सामान्य नागरिक सहज पोहोचूच शकत नाही, म्हणजेच नागरिकांपासून जाणीवपूर्वक हे फोटो लपवण्यात आले असा संतप्त निष्कर्ष काढला जात आहे. प्रशासनाकडून दिलेले ‘रंगरंगोटीच्या काळात बदल’ हे कारण जनतेला मान्य नसून, रंगरंगोटी पूर्ण झाल्यानंतरही फोटो पूर्वीच्या जागी पुन्हा का लावले गेले नाहीत हा प्रश्न अनुत्तरित आहे. या प्रकरणात विद्यमान नगराध्यक्ष उत्तम तायप्पा जाधव यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, शिक्षक समितीचे दोन वेळा संचालकपद भूषवलेला, शासकीय व राजकीय कार्यालयांचा अनुभव असलेला व्यक्ती म्हणून महाराजांचे फोटो नेमके कुठे असतात हे त्यांना माहिती असायलाच हवे, मगही महाराजांच्या फोटोऐवजी स्वतःच्या नावाची पाटी का लावली गेली, हा प्रश्न जनतेतून प्रखरपणे विचारला जात आहे. मोठमोठ्या शासकीय कार्यालयांत महाराजांचा फोटो प्रथम दर्शनी असतो, हे माहीत असूनही या बाबीकडे दुर्लक्ष का झाले, आणि दुसऱ्या मजल्यावर—नागरिकांच्या नजरेपासून दूर—फोटो का लावले, यामागे अहंकार, सत्तेचा माज आणि राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा उघडपणे रंगली आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या मनात अपमानाची भावना खोलवर रुजली, रोष उफाळून आला आणि जनतेतून द्वेषाची धार वाढली आहे; हा संताप आता शब्दांपुरता न राहता आंदोलनाच्या दिशेने सरकतो आहे. नागरिकांची ठाम मागणी आहे की पूर्वी ज्या ठिकाणी महापुरुषांचे व छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो होते, त्याच ठिकाणी ते तात्काळ व प्रथम दर्शनी लावण्यात यावेत, अन्यथा आटपाडी तालुक्यात तीव्र निषेध, उग्र आंदोलन आणि प्रशासनाला हादरवणारी भूमिका घेतली जाईल. हा प्रश्न केवळ फोटोचा नसून सन्मानाचा, इतिहासाचा आणि जनतेच्या श्रद्धेचा असल्याचे नागरिक ठणकावून सांगत असून, आता प्रशासन त्वरित पावले उचलते की जनतेचा उद्रेक अधिक भडकतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
महापुरुषांचे फोटो काढून स्वतःच्या नावाची लावली पाटी: ी आटपाडी नगराध्यक्षाचा प्रताप
पॉलिटिक्स 24 न्यूज
0
Post a Comment