सांगली :पोलीस, सीबीआय आणि आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत तब्बल ५९ लाख ९ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा सांगली सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुणे परिसरातून दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या रोकडसह मोठ्या प्रमाणावर बँकांचे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांच्या नव्या आणि घातक फसवणूक पद्धतीचा (Modus Operandi) खुलासा झाला आहेव्हिडिओ कॉलद्वारे दिली अटकेची धमकी
याबाबत अण्णासाहेब बाळगोंडा पाटील (वय ६१, रा. सुतार गल्ली, सावळज, ता. तासगाव, जि. सांगली) या सेवानिवृत्त वृद्धाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपींनी पाटील यांच्याशी फोन आणि व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला होता. आपण सीबीआय, इनकम टॅक्स आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे त्यांनी भासविले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्यांच्या व्हॉट्सॲप प्रोफाईलवर पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो ठेवले होते. तसेच व्हॉट्सॲपवर सीबीआयचा लोगो, 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया', 'सुप्रीम कोर्ट', 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' यांच्या नावाची बनावट आणि खोटी पत्रे पाठवून पाटील यांना 'डिजिटल अरेस्ट' करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी पाटील यांच्याकडून ५९ लाख ९ हजार रुपयांची रक्कम उकळण्यात आलीतांत्रिक तपासाअंती पुण्यातून आवळल्या मुसक्यासायबर पोलिसांनी या गुन्ह्याचा तांत्रिक तपास सुरू केला असता, फसवणुकीतील २९ लाख ६० हजार रुपयांची रक्कम आरोपींच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी पुणे परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेतले. यात अबू हुसेन समसुल आलम (वय ३८, सध्या रा. हडपसर, पुणे, मूळ रा. मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) आणि सुशील अकील राम (वय ३४, सध्या रा. मगरपट्टा सिटी, पुणे, मूळ रा. पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहेअटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरझडतीमध्ये पोलिसांना गुन्ह्यासाठी वापरले जाणारे मोठे जाळे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:४ मोबाईल फोनविविध बँकांचे १८ डेबिट व क्रेडिट कार्ड्स२४ चेकबुक आणि ६ पासबुक६ सिमकार्ड्स आणि इतर साहित्यया आंतरराज्यीय टोळीचे आणखी कुठे आणि कोणाशी धागेदोरे जोडलेले आहेत, याचा शोध सायबर पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे.
Post a Comment