⚡ ब्रेकिंग News

आटपाडी तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा रणसंग्राम; महसूल प्रश्न आता जागेवरच सुटणार!

आटपाडी तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विषयक प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी आटपाडी तालुक्यात मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार श्रीमती शितल बंडगर यांनी दिली. 
राज्याचे महसूल मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री. अशोक काकडे, उपविभागीय अधिकारी डॉ. श्री. विक्रम बांदल व उपजिल्हाधिकारी श्री. अजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. तहसीलदार श्रीमती शितल बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार खरसुंडी मंडळ येथे दि. 07/03/2026 रोजी, दिघंची मंडळ येथे दि. 14/03/2026 रोजी, आटपाडी मंडळ येथे दि. 10/04/2026 रोजी, शेटफळे येथे दि. 17/04/2026 रोजी, करगणी येथे 08/05/2026 रोजी व तालुकास्तरीय समारोप शिबिर 15/05/2026 रोजी तहसील कार्यालय आटपाडी येथे आयोजित केले जाणार आहे. या शिबिरांमध्ये भोगवटदार वर्ग दोन जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतर करणे, वारस नोंदी, सातबारा दुरुस्ती, कालबाह्य नोंदी कमी करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ, पी एम किसान योजनेअंतर्गत कामकाज, ॲग्रीस्टॅक सेवा,  श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना, इत्यादी कामे केली जाणार आहेत. अद्यावत सातबारा उताऱ्यांचे वितरण हे शिबिरात करण्यात येणार आहे. तसेच आज दि. 05/03/2026 रोजी खरसुंडी मंडळात शनिवार दि. 07/03/2026 रोजी होणाऱ्या खरसुंडी मंडळातील 21 गावांमध्ये जनजागृती करणेत आली असून सरपंच, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, मंडळातील सर्व लोकप्रतिनिधी व पोलीस पाटील यांना कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका देण्यात आली आहे. महसूल विभागाच्या सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असून तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार श्रीमती शितल बंडगर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...