⚡ ब्रेकिंग News

सांगलीत राजकीय खळबळ: विखे पाटलांचे खासदार विशाल पाटलांना भाजप प्रवेशाचे उघड 'आवतन'

सांगली : सांगली जिल्ह्याच्या राजकारणात काल जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांना भाजपाने प्रवेशाच्या दिलेल्या आवतनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगली जिल्हा 'भाजपमय' झाला असून, विशाल पाटलांनी विकासाच्या प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन केले. मिरज तालुक्यातील बेळंकी येथे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी विखे पाटील यांनी विशाल पाटलांच्या तरुण नेतृत्वाचे कौतुक केले. "विशाल पाटील एक आश्वासक नेतृत्व आहेत. आमचे आणि त्यांच्या कुटुंबाचे (वसंतदादा पाटील घराणे) जुने ऋणानुबंध आहेत. जर ते भाजपमध्ये आले, तर त्यांचे मनापासून स्वागत आहे. भाजप गेल्या काही काळापासून सांगलीतील काँग्रेसचे बालेकिल्ले ढासळण्याचा प्रयत्न करत आहे. विशाल पाटलांना आपल्याकडे खेचून 'वसंतदादा गट' आपल्या बाजूने वळवणे हा भाजपचा मोठा डाव मानला जात आहे. भाजपाचा डोळा वसंतदादा पाटील घराण्यावर आहे ‌. यापूर्वी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही विशाल पाटलांना दोन वेळा भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती.
  विशाल पाटील सध्या संसदेत अपक्ष खासदार म्हणून काम पाहत आहेत त्यांनी यापूर्वी भाजपच्या ऑफर्सवर प्रतिक्रिया देताना "मी लोकांसाठी काम करत आहे" असे म्हटले होते, मात्र भाजप नेत्यांच्या या वाढत्या आग्रहामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...