⚡ ब्रेकिंग News

विशेष रिपोर्ट: इराणच्या 'अभेद्य' बंकरमध्ये मोसादचा थरार; खामेनेईंच्या श्वासावर ६० सेकंदात घाला!

तेहरान/जेरुसलेम:
जगातील सर्वात घातक गुप्तहेर संघटना कोणती? या प्रश्नाचे उत्तर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा एकदा जगाला मिळाले. इस्रायली गुप्तहेर संस्था मोसादने (Mossad) इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षिततेचा अभेद्य मानला जाणारा तट फोडून थेट अयातुल्ला अली खामेनेई यांच्यापर्यंत मजल मारली. ज्यावेळी खामेनेई स्वतःला एका अतिसुरक्षित बंकरमध्ये सुरक्षित समजत होते, त्याच वेळी मोसादचे एजंट त्यांच्या श्वासावर लक्ष ठेवून होते. गेल्या अनेक दशकांपासून मोसादने इराणमध्ये आपल्या एजंट्सचे एक असे जाळे विणले होते, ज्याची कल्पना इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'नाही आली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, बंकरमध्ये जाण्यापूर्वी खामेनेई यांनी घेतलेल्या शेवटच्या श्वासापर्यंतची खबर इस्रायली गुप्तचरांकडे होती.
२८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास मोसादने आपल्या 'ऑपरेशन एपिक फ्युरी'ला अंतिम स्वरूप दिले.
अचूक वेळ: खामेनेई जेव्हा बंकरमध्ये एका महत्त्वाच्या लष्करी बैठकीसाठी पोहोचले, तेव्हाच हल्ल्याचा आदेश देण्यात आला. ६० सेकंदांच्या आत सुमारे ३० 'बंकर बस्टर' बॉम्बनी बंकरचा वेध घेतला.
परिणाम: जमिनीखाली अनेक फूट खोल असलेल्या सिमेंट आणि पोलादाच्या भिंतींना चक्काचूर करत मोसादने आपले ध्येय साध्य केले.
इराणच्या गुप्तचर खात्याला आपल्याच सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षिततेबद्दल अंधारात ठेवण्यात मोसाद यशस्वी झाले. इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देऊन, हाय-टेक ड्रोन आणि विमानांनी ही कारवाई केली. खामेनेईंसोबत त्यांचे अनेक उच्चपदस्थ लष्करी अधिकारीही या कारवाईत मारले गेल्याची माहिती समोर येत आहे.
जइराणने ४० दिवसांचा शोक जाहीर केला असून प्रतिहल्ल्याची धमकी दिली आहे. मात्र, मोसादने ज्या पद्धतीने इराणच्या सत्तेच्या केंद्रस्थानी घुसखोरी केली, त्याने जगातील सर्वच हुकूमशहांच्या मनात धडकी भरवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...