⚡ ब्रेकिंग News

आटपाडी बाजार समितीच्या पावणेतीन कोटीच्या कामांना मंजुरी : सभापती संतोष पुजारी

आटपाडी (प्रतिनिधी):
आमदार सुहास बाबर आणि शिवसेना नेते तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने विकासाची मोठी भरारी घेतली आहे. सभापती संतोष पुजारीउपसभापती आणि संचालक मंडळाच्या विशेष प्रयत्नातून बाजार समितीच्या आवारात विविध अत्यावश्यक विकासकामांना मंजुरी मिळाली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या बांधकामांना प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती सभापती संतोष पुजारी यांनी दिली.
बाजार समितीच्या मुख्य आवारात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने १ कोटी १५ लाख रुपये खर्चून आधुनिक डाळिंब पणन संकुल गाळ्यासमोरील पेव्हिंग ब्लॉक व गटार बांधकाम केले जाणार आहे. तसेच, आटपाडी आणि दिघंचीउपबाजार आवारात प्रत्येकी ८० टन क्षमतेचे 'वे-ब्रिज' (वजनकाटा) उभारण्यासाठी ५३ लाख ९४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, १६ लाख ५९ हजार रुपये खर्चून पॅक हाऊस शेड नं. ३ चे कामही मार्गी लावले जाणार आहे.
भविष्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प:
केवळ सध्याची कामेच नव्हे, तर भविष्यातील नियोजनाचा आराखडाही तयार आहे. यामध्ये ३ कोटी ७ लाख रुपये खर्चाचे दुसरे आधुनिककोटी ७ लाख रुपये खर्चाचे दुसरे आधुनिक डाळिंब पणन संकुल, १ कोटी ६८ लाख रुपयांचे 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन', आणि २५ लाख २८ हजार रुपयांचे स्वच्छतागृह (टॉयलेट-बाथरूम) बांधकाम प्रस्तावित आहे. ऊर्जेची बचत करण्यासाठी आटपाडी मुख्य आवारात २३ लाख आणि दिघंची येथे सुमारे १४ लाख रुपयांचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत.
"बाजार समितीचा संपूर्ण कायापालट करून राज्यात नावलौकिक मिळवण्याचे आणि शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावित सर्व बांधकामे लवकरच पूर्ण होतील," असा विश्वास सभापती संतोष पुजारी यांनी व्यक्त केला आहे. या विकासकामांमुळे आटपाडी बाजार समिती आता अधिक हायटेक आणि शेतकरी स्नेही होणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...