⚡ ब्रेकिंग News

जिल्हा बँकेतील 8 संचालक अपात्र ठरवा : सदाभाऊ खोत

 

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आठ संचालकांनी सलग 10 वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा बँकेतील मानसिंगराव नाईक, दिलीप पाटील, संग्रामसिंह देशमुख, विशाल पाटील, महेंद्र लाड, मोहनराव कदम, सुरेश पाटील आणि बाळासाो होनमोरे हे संचालक 2015 ते 2021 आणि 2021 ते 2026 या दोन्ही कार्यकाळात सलगपणे कार्यरत आहेत. या सर्वांचा संचालक म्हणून कार्यकाळ जवळपास 11 वर्षे झाला आहे.दहा वर्षे संचालक पदाबाबतचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या निवडणुकीत होईल. आता झाली तर ती केवळ सांगली जिल्हा बँकेत नाही, तर संपूर्ण राज्यात करावी लागेल.

- मानसिंगराव नाईक, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...